Mapusa Police: म्हापसा पोलिसांनी 56 मोबाईल फोन मूळ मालकांना केले परत; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत काढला माग

गेल्या सहा महिन्यात हरवले होते फोन
Mapusa police returned mobile phone to owners
Mapusa police returned mobile phone to owners Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Police: हरवलेले, चोरीला गेलेले असे एकूण 56 मोबाईल फोन म्हापसा पोलिसांनी मूळ मालकांना परत सुपूर्द केले आहेत. म्हापसा पोलिस स्टेशनच्या हद्दित गेल्या सहा महिन्यात हे फोन हरवले, चोरीला गेलेले होते. पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत यातील अनेक मोबाईल फोन शोधून काढले आहेत.

Mapusa police returned mobile phone to owners
Kala Academy Slab Collapsed: कला अकादमी स्लॅब दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला नोटीस; मंगळवारी अहवाल देण्याचे आदेश

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार सोमवारी 17 जुलै रोजी म्हापसा पोलिस कर्मचार्‍यांनी म्हापसा पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या 06 महिन्यांत हरवलेले 56 मोबाईल फोन मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून हरवलेले मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी म्हापसा पोलिसांनी पोलिस निरीक्षक सीताकांत नायक यांच्या देखरेखीखाली विशेष टीम तयार केली. या पथकाने गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला.

ऑनलाइन CEIR पोर्टलचा वापर करत पोलिस कर्मचाऱ्यांनी या फोनचा माग ठेवला आणि अखेर संशयितांना ताब्यात घेत मोबाईल फोन हस्तगत केले. पोलिसांनी मूळ मालकांना हे 56 मोबाईल फोन सुपूर्द केले आहेत.

यातील बहुतांश फोन प्रवासात तसेच खरेदी करताना हरवले, चोरीला गेले होते. काही मोबाईल फोन विविध ठिकाणी सापडले होते. मूळ मालकांची पडताळणी करूनच त्यांना हे मोबाईल फोन परत देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com