Kala Academy Slab Collapsed: कला अकादमीच्या नुतनीकरण कामात सुरू असलेल्या ओपन एअर ऑडिटोरियम इमारतीचा स्लॅब सोमवारी कोसळला. गोव्यात सोमवारी दिवसभर हा विषय केंद्रस्थानी राहिला. विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले.
दरम्यान, आता राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर यांना नोटीस पाठवली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून प्राथमिक अहवाल सादर करावा. कंत्राटदाराकडून याबाबत सविस्तर म्हणणे घ्यावे. आयआयटी रूरकी किंवा इतर कोणतीही आयआयटी किंवा एनआयटीसारख्या स्वतंत्र संस्थेकडून याची तपासणी करावी, असे गोयल यांनी नोटिशीत म्हटले आहे.
दरम्यान, यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर यू. पी. पार्सेकर यांनी संबंधित कंत्राटदार मे. टेक्टॉन बिल्डर्स प्रा. लि. यांना नोटीस बजावली आहे. ही दुर्घटना गांभीर्याने घेतली असून याबाबत सविस्तर उत्तर 18 जुलैपर्यंत सादर करावे, असे आदेश दिले आहेत.
आयआयटी मुंबईकडून स्वतंत्र अहवालही द्यावा, असेही आदेश पार्सेकर यांनी दिला आहे. तसेच पार्सेकर यांनी आयआयटी रूरकी या संस्थेला या प्रकरणाची स्वतंत्र संस्था म्हणून प्राधान्याने सविस्तर चौकशी करावी, आणि कारणे सादर करावीत, यासाठी पत्र लिहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.