
पणजी: मेरशी येथील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका पर्यटक बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बस पूर्णपणे जळून तिचा सांगाडा शिल्लक राहिला.
बसचालकाने दिलेल्या माहितीनुसार, ही बस पर्यटकांना घेऊन मडगाव रेल्वेस्थानकावर निघाली होती. मेरशी सर्कलजवळ पोहोचताच बसच्या मागच्या चाकातून धूर येत असल्याचे काही पर्यटकांना समजले.
त्यांनी लागलीच याची कल्पना चालक व वाहकाला दिली. त्यांनी बस तात्काळ थांबवली आणि प्रवाशांना अगोदर सुरक्षितपणे बाहेर काढले. अग्निशमन दलाला त्वरित कळविण्यात आले. पण ते येईपर्यंत बस पूर्णपणे जळाली होती. दरम्यान, आगीचे कारण समजले नाही.
बसच्या मागील चाकाला लागलेली आग काही वेळातच संपूर्ण बसमध्ये पसरली. त्यामुळे प्रवासी पर्यटकांची तारांबळ उडाली. त्यांनी एकच कल्लोळ केला. जो तो आपला जीव वाचविण्यासाठी धडपडू लागला.
त्यामुळे बसच्या दरवाजाकडे प्रवाशांची एकच गर्दी झाली. त्यांना बसमधून उतरणे अवघड बनले. यावेळी बसचालक व वाहकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.