Cancer News : कर्करोगाशी लढण्यासाठी मानसिक पाठबळ गरजेचे : राज्यपाल पिल्लई

Cancer News : कर्करोगाशी झुंज देण्यासाठी जशी आरोग्य यंत्रणा महत्त्वाची आहे त्यासोबतच मानसिक, सामाजिक पाठबळ देखील महत्त्वाचे असून त्यासाठी अनेक संस्थांनी कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी केले.
Cancer
CancerDainik Gomantak
Published on
Updated on

Cancer News :

पणजी, भारतात दिवसेंदिवस कर्करोगाच्या रूग्णात वाढ होत आहे. येत्या काळात सात व्यक्तींमागे एक रूग्ण हा कर्करोगग्रस्त असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कर्करोगाशी झुंज देण्यासाठी जशी आरोग्य यंत्रणा महत्त्वाची आहे त्यासोबतच मानसिक, सामाजिक पाठबळ देखील महत्त्वाचे असून त्यासाठी अनेक संस्थांनी कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी केले.

संजीवनी लाईफ बियॉन्ड कॅन्सरद्वारे आयजित इंटरग्रेटीव्ह कॅन्सर केअर संबंधी आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्‍घाटनप्रंसगी बोलत होते. या परिषदेचे आयोजन गोवा मनोरंजन संस्थेत करण्यात आले होते.

Cancer
Goa Cyber Fraud: पैसे उकळण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे फेक व्हॉट्सॲप खाते, गोव्यात 2 तक्रारी दाखल

यावेळी पद्मश्री गोपीनाथ के.एस., डॉ. सुजाता कदम, जीएमसीच्या डॉ. अनुपमा बोरकर, डॉ. गणेश राव, रूबी अहलुवालिया आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान राज्यपाल पिल्लई म्हणाले, संजीवनी लाईफ बियॉन्ड कॅन्सर या संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून त्यांनी लाखो कर्करोगग्रस्त रूग्णांना मदत केली आहे.

त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

राजभवनकडून सर्व ती मदत

गोवा राजभवनद्वारे राज्यातील कर्करोगग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. राज्यातील हजारो कर्करोगग्रस्तांना प्रत्येकी २५ हजार रूपये मदत करण्यात आली. त्यांना त्यांच्या घरापर्यंत ही मदत पोहचविण्यात आली.

राज्यात कर्करोगाशी झुंजणाऱ्या रूग्णांसाठी वावणाऱ्या बिगर सरकारी संस्थाना देखील मदत केल्याचे समाधान असल्याचे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com