Morbi bridge collapse: १९८६ मध्ये 'हा' पूल कोसळला अन् दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला

गोव्यात 36 वर्षांपुर्वी घडलेली घटना, चौकशी आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी नाहीच
Remembering Mandovi Bridge Collapse
Remembering Mandovi Bridge CollapseDainik Gomantak
Published on
Updated on

Mandovi Bridge Collapse: गुजरातमधील मोरबी नदीवरील झुलता पुल कोसळून 135 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने गोवेकरांना 36 वर्षांपुर्वीच्या घटनेची आठवण करून दिली आहे. 5 जुलै 1986 रोजी मांडवी नदीवरील नेहरू पुल कोसळला होता. अर्थात या दुर्घटनेत सुदैवाने जीवीतहानी झाली नव्हती.

Remembering Mandovi Bridge Collapse
Mauvin Godinho Meets Aviation Minister: मंत्री माविन गुदिन्हो यांनी घेतली केंद्रीय नागरी उड्डयण राज्य मंत्र्यांची भेट

हा पुल 1970 मध्ये वाहतुकीस खुला केला गेला. 16 वर्षांनी हा पुल कोसळला. अभियांत्रिकी क्षेत्रातील ती एक मोठी दुर्घटना होती. संपुर्ण गोवा या घटनेने हादरला. पणजी-म्हापसा वाहतूक बंद पडून पणजीचा उत्तर गोव्याशी संपर्क तुटला. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी तत्कालीन गोवा सरकारने 1986 मध्ये दिवंगत न्यायमूर्ती देवीदत्त मंगेश रेगे (1923-2013) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. (Mandovi Bridge Collapse in 1986)

का कोसळला पुल?

तामिळनाडुतील माजी सहाय्यक कार्यकारी अभियंता ए. अमृतनाथन यांनी या घटनेचा अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या निरिक्षणात म्हटले होते की, प्री-स्ट्रेस्ड केबल्स गंजल्या होत्या. काही केबल झुकल्या होत्या. डेक काँक्रिटचा थर पातळ होता. त्यामध्येच केबल्स जोडल्या होत्या. त्यातील बहुतांश तारांना सिमेंट ग्राउट नीट केले नव्हते. केबल्स थ्रेड केल्या जात होत्या तिथे पोकळी होती. आणि बांधल्यापासून पुल कोसळेपर्यंत जवळपास 16 वर्षे काँक्रिट डेकमधून पाणी गळत होते.

बांधकामात वापरलेली समुद्रकिनाऱ्यावरील वाळू

रेगे आयोगाने सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला पुलाचे बांधकाम साहित्य तपासायला सांगितले होते. त्यावर काँक्रीट मिक्समध्ये समुद्रकिनाऱ्यावरील वाळू आणि खाऱ्या पाण्याचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

Remembering Mandovi Bridge Collapse
Goa BJP: दिगंबर कामतांना 'पॉवर'फुल्ल मंत्रिपद; 'खरी कुजबूज'

पुलाचे लोड टेस्टिंग झाले नव्हते...

कोणतीही अत्यावश्यक चाचणी न करताच तसेच किती वजनभार पुल पेलू शकतो, हे न तपासताच पुलाचे अनावरण केले गेले. बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याला न्यायमूर्ती रेगे यांनी याबाबत विचारले असता, लोड टेस्टिंगमुळे पूल कोसळण्याची भीती असल्याचे त्यांनी मान्य केले होते. विशेष म्हणजे, तरीही हा पुल 16 वर्षे टिकला.

गोव्याचे हवामान आणि पुलांचा सुरक्षितता

गोव्यातील पुलांवर येथील आर्द्रतेचा, उष्णकटीबंधीय हवामानाचा, हवेतील खारेपणाचा, गंज लागणाऱ्या वातावरणाचा परिणाम होतो. गोव्यातील कोणत्याही RCC पुलाला मानक चाचण्या पास करणे आवश्यक असते. खारटपणारोधी, गंजरोधी उपाय योजिले पाहिजे होते. गंज प्रतिरोधक सिमेंट वापर, नवीन गंज अवरोधक वापरणे आवश्यक असतो. RCC मिश्रणासाठी वापरलेले पाणी क्षार आणि क्लोरीनपासून मुक्त हवे, काँक्रीट चांगले होण्याचा कालावधी कमी करू नये, धातूंच्या जोडांच्या ठिकाणी गंजरोधक पेंट्सचे जाड कोटिंग हवे होते.

गुजरातमध्ये नेमके काय घडले?

दरम्यान, गुजरातमधील मोरबी येथे मच्छु नदीवरील केबल पुल 30 ऑक्टोबर रोजी कोसळला. या दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू झाला तर 177 जणांना वाचविण्यात यश आले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 140 वर्षे जुना असलेला हा पुल दुरूस्तीसाठी 6 महिने बंद होता. नुतनीकरणानंतर पाच दिवसांपुर्वी पूल खुला केला होता. दुर्घटना घडली तेव्हा जवळपास 500 पर्यटक या पुलावर होते आणि काही तरूण उत्साहाच्या भरात हा पुल हलवत होते. त्यामुळे अनेकांना चालणेही अवघड झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com