Mechanized Farming : कुळेतील २५ शेतकऱ्यांनी धरली यांत्रिक शेतीची कास; श्रमाची कामे झाली सुलभ

Mechanized Farming : आधुनिक शेतीत कामगारांची जागा आता विविध यंत्रांनी घेतली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जात आहे.
Mechanized Farming
Mechanized FarmingDainik Gomantak

Mechanized Farming :

तांबडीसुर्ला, पारंपरिक शेती कालबाह्य होत चालली असताना आधुनिक शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू लागली आहे.

आधुनिक शेतीत कामगारांची जागा आता विविध यंत्रांनी घेतली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जात आहे. कुमारमळ, कुळे येथील सुमारे २५ शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले असून पहिल्यांदाच यंत्राच्या साहाय्याने शेतीची लागवड करत भरघोस पीक घेतले आहे.

शेती कसणे हे कष्टदायक काम असते, त्यासाठी श्रमशक्तीही खूप लागते. त्यात मजूरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणे जड जात होते. परंतु आधुनिक यंत्रांमुळे शेतीतील कामे सुलभ झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवा हुरुप आला आहे.

पावर टिलर हे नांगरणी यंत्र असून शेतकऱ्यांसाठी ते फारच फायदेशीर ठरत आहे. कमी श्रमात आणि परवडण्याऱ्या दरात हे यंत्र काम करते. ताशी ४०० रुपये भाडे आकारले जाते. कुमारमळ येथील शेतकऱ्यांनी या यंत्राने शेतीची नांगरणी करून घेतली.

मशागत केल्यानंतर भात रोपांची लागवड देखील यंत्राच्या साहाय्याने ''श्री'' पद्धतीने करण्यात आली. या पद्धतीमुळे भाताचे उत्पादन दुप्पट मिळते, त्यामुळे बहुतांश शेतकरी या पध्दतीचा अवलंब करतात. एक चौदाच्या उताऱ्यावरील जमिनीचे एकूण क्षेत्रफळ पाहून भात रोपण प्रक्रियेचे भाडे ठरविण्यात येते, असे शेतकरी अमर च्यारी यांनी सांगितले.

भाताची कापणी आणि मळणी हे शेतकऱ्यांसाठी कष्टाचे काम असे. यंत्राच्या मदतीने ही कामे करणे शेतकऱ्यांना सुलभ झाले आहे. यंत्राच्या साहाय्याने भाताची कापणी तसेच तेच यंत्र मळणीसाठीही वापरले जाते. त्यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. कापणी व मळणीसाठी शेतकऱ्यांना तासाला बाराशे रुपये भाडे द्यावे लागते. हे भाडे परवडणारे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Mechanized Farming
Goa's Top News: गोमेकॉत डॉक्टरला धक्काबुक्की, बेतोडा अपघातात एक ठार; राज्यातील ठळक बातम्या

काजू लागवडीवर भर

जंगली जनावरांच्या उपद्रवामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकरी पारंपरिक शेतीपासून दूर गेले आहेत. भात शेती विरळ होत चालली आहे. काहींनी बागायती पिकाकडे आपला मोर्चा वळला आहे. विशेषत: पडीक जागेत काजू लागवडीवर भर दिला आहे.

पारंपरिक अवजारे कालबाह्य

यंत्र शेतीमुळे शेतकऱ्यांची पारंपरिक अवजारे कालबाह्य होत चालली आहेत. तसेच लागवडीची पद्धतही बदलत चालली आहे. त्यामुळे येणाऱ्या नव्या पिढीला पारंपरिक अवजारांचे दर्शन दुर्मिळ होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com