Goa Environment: मायमोळे तळ्याचे सौंदर्यीकरण करणार; ''अमृत सरोवर'' अभियान अंतर्गत उपक्रम

सौंदर्यीकरण केल्याने मायमोळे तळे एक पर्यटनस्थळ म्हणून रूपाला येईल, असे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.
Goa Environment |Lake
Goa Environment |Lake Dainik Gomantak

Goa Environment: वास्को येथील मायमोळे तळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ''अमृत सरोवर'' अभियान अंतर्गत या उपक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे मायमोळे तळे एक पर्यटनस्थळ म्हणून रूपाला येईल, असे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.

लोकवस्ती वाढत गेल्याने तसेच सांडपाण्याची योग्य सुविधा नसल्याने आसपासच्या वस्तीतील सांडपाणी मायमोळे तळ्यात सोडण्यात येऊ लागल्याने याचे एका मोठ्या डबक्यामध्ये रूपांतर झाल्याचे वास्कोवासीयांना पाहण्यास मिळत आहे.

मायमोळे तळ्याचे सौंदर्यीकरण हा माझा ''ड्रीम प्रोजेक्ट'' आहे. त्यामुळे तो पूर्ण व्हावा, यासाठी माझ्याकडून सर्व प्रयत्न केले जातील, असे साळकर म्हणाले.

Goa Environment |Lake
Goa Environment: पोर्तुगीजकालीन बोरी पुलाचे शेवटचे अवशेष हटविले

पहिल्या टप्प्यातील एक कोटी मंजूर झाले आहे. जसजसे काम पुढे सरकत जाईल, तसतसे आणखी किती निधीची गरज असेल ते स्पष्ट होईल. मायमोळे तळे हे कोमुनिदादच्या मालकीचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ना हरकत दाखला मिळाला पाहिजे.

यासंबंधी मी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे चर्चा केली होती. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रकल्प सौंदर्यीकरणाचा असून त्याला कोमुनिनादची सर्व परवानगी मिळेलस यात वाद नाही. या प्रकल्पाचा लाभही कोमुनिदादला मिळेल. ज्या काही अडचणी असतील, त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल, असेही साळकर यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com