Margao News : कोणतीही भीती आणि शंका न बाळगता भाजपला साथ द्या! नागालँडच्या खासदार कोन्याक

Margao News : यावेळी कामत, तुयेकर यांच्यासह भाजपचे नावेली प्रभारी सुबोध गोवेकर, नावेली मंडळ अध्यक्ष परेश नाईक, सरचिटणीस दीपक सावंत, दवर्ली दिकरपालचे सरपंच संतोष नाईक, आके बायशचे पंच डॅनी, रामदास उसगावकर उपस्थित होते.
Margao
Margao Dainik Gomatnak

Margao News :

मडगाव, नागालॅंडच्या राज्यसभा खासदार फंगनाॅन कोन्याक यांनी नावेली मतदारसंघातील ख्रिश्चन मतदारांशी संवाद साधून भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचा प्रचार केला. माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यावेळी उपस्थित होते.

तळावली, आके बायश व दवर्ली चर्च सभागृहात घेण्यात आलेल्या कोपरा बैठकांत कोन्याक सहभागी झाल्या. भाजपविषयी विरोधकांकडून अपप्रचार करून जनतेची व विशेषतः अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करण्यात येत आहे. भाजप हा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा निधर्मीवादी पक्ष आहे.

Margao
Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

आपण ख्रिश्चन असूनही भाजपने आपल्यास खासदारकी दिली. कोणतीही भीती व शंका न बाळगता भाजपला साथ द्या, असे आवाहन कोन्याक यांनी केले.

यावेळी कामत, तुयेकर यांच्यासह भाजपचे नावेली प्रभारी सुबोध गोवेकर, नावेली मंडळ अध्यक्ष परेश नाईक, सरचिटणीस दीपक सावंत, दवर्ली दिकरपालचे सरपंच संतोष नाईक, आके बायशचे पंच डॅनी, रामदास उसगावकर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com