Goa News : विद्यार्थ्यांनी काटकसरीची सवय लावावी : अभिजीत सावंत

Goa News : मडगाव सम्राट क्लबच्‍या उन्हाळी शिबिराचा समारोप
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News :

सासष्टी, प्रत्येकाने अथक परिश्रम व प्रामाणिकपणे कार्य करून स्वत:ची यशोगाथा तयार करावी. स्वत:चे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने काटकसरीची सवय लावून घ्‍यावी, असे आवाहन उद्योजक तथा समाजसेवक अभिजीत सावंत यांनी केले.

मडगाव सम्राट क्लबने चौगुले महाविद्यालयात आयोजित केलेल्या २६व्या उन्हाळी शिबिराच्‍या समारोप सोहळ्‍यात सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नावेली येथील परपेच्युअल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिब्रेटा यांनी सांगितले की, मुलांनी अभ्यासावर भर देतानाच स्पर्धात्मक परीक्षांसाठी वेगवेगळी माहिती गोळा करावी.

या शिबिरात नुपूर नाईक, वेदिका देसाई, आर्या नाईक, सीया नाईक यांनी नृत्य, गायन व वक्तृत्व प्रशिक्षण मुलांना दिले. सर्वेश आंबोलीकर यांनी कला व चित्रकलेचे धडे दिले. श्रवण, श्रुती, देवराज देसाई, प्रत्युश केंकरे यांनी मुलांना वेगवेगळे खेळ शिकविले.

वेदिका देसाई व जयेश भगत यांनी फॅशन शो व वेशभूषा सादरीकरण केले. स्मिता पै यांनी अभिनयावर सत्र घेतले. योग व सूर्यनमस्कार सत्र विश्‍‍वनाथ स्वार व रामा नाईक यांनी घेतले.

डॉ. साचिका आल्मेदा व एन. आल्वारीस यांनी परिणामकारकरित्या सार्वजनिक मंचावर कसे बोलावे याबद्दल प्रशिक्षण दिले.

Goa
Goa Statehood Day: प्रधानमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती आणि CM सावंत यांनी दिल्या घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा

वक्तृत्व स्पर्धेत संकेत, आनाचेल प्रथम

शिबिरात घेतलेल्‍या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात संकेत बडवे याला प्रथम, क्रिस्टल सिक्वेराला द्वितीय तर इशा पागी हिला तृतीय क्रमांक प्राप्‍त झाला. लहान गटात आनाचेल डायस, राजवीर देसाई व केडन कार्वाल्हो यांना अनुक्रमे बक्षिसे मिळाली.

शिबिरातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून केडन कार्व्हालो व इफ्रा सईद यांची लहान गटात तर समरिक लोटलीकर व इशा पागी यांची मोठ्या गटात निवड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com