Margao News : तोतया पोलिसाकडून मटकेवाल्‍याला ‘टोपी’; आगुस्‍तीन असण्‍याची शक्‍यता

Margao News : तुरुंगातून सुटल्‍यानंतर पुन्‍हा सक्रिय
Margao
Margao Dainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

मडगाव, स्‍वत: पोलिस असल्‍याचे एका मटकेवाल्‍याला एक लाख १५ हजारांची टोपी घालणारा आगुस्‍तीन कार्व्हाल्हो हाच असावा, याची पक्‍की खात्री पोलिसांनी व्‍यक्‍त केली आहे.

मात्र या नव्‍या लुबाडणुकीच्‍या प्रकरणात कोणी तक्रारच न केल्‍यामुळे त्‍याला पकडावे कसे? या चिंतेत पोलिस आहेत. काल ‘गोमन्‍तक’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्‍यानंतर सगळीकडे खळबळ माजली होती. पोलिसांचे नाव सांगून लोकांना लुटले कसे जाते, असा सवाल लोकांनी केला होता. संशयित आगुस्‍तीन कार्व्हाल्हो हा माजोर्डा येथे रहाणारा असून यापूर्वी त्‍याला अशा अनेक प्रकरणात पोलिसांनी अटकही केली होती.

सासष्‍टीतील किनारपट्टी भागात या आठवड्यातच त्‍याने तोतया पोलिस बनून मटकेवाल्‍याकडून १ लाख १५ हजार रुपये उकळले आणि नंतर तो फरार झाला. मात्र लुबाडणूक झालेला स्‍वत: मटका घेणारा असल्‍याने त्‍याने या बाबतीत तक्रार न करणेच पसंत केले.

Margao
South Goa Loksabha: काँग्रेस, भाजपसाठी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ एवढा महत्वाचा का आहे?

हल्‍लीच तुरुंगातून सुटला होता

यापूर्वी या आगुस्‍तीनने आपण पोलिस असल्‍याचे सांगून काही ट्रकवाल्‍यांनाही लुटले होते. त्‍यामुळे गोव्‍यातील कित्‍येक पोलिस ठाण्‍यावर गुन्‍हे नोंद झाले होते.

अशाच एका गुन्‍ह्याच्‍या प्रकरणात तो दोषी सापडल्‍याने त्‍याला तुरुगांची शिक्षा झाली होती. हल्‍लीच तो तुरुंगातून शिक्षा संपवून बाहेर आला होता. बाहेर आल्‍यानंतर त्‍याने लगेच आपल्‍या जुन्‍या करामती सुरू केल्‍या असाव्‍यात, अशी पोलिसांना शंका आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com