Fish Market : मासळी मार्केटमध्ये कचऱ्याच्या राशी; रोगराईला आमंत्रण

Fish Market : येथील कचऱ्याच्या राशी आरोग्यास धोकादायक असून यापूर्वीही कित्येकदा आम्ही या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे; पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.
Fish Market
Fish Market Dainik Gomantak
Published on
Updated on

Fish Market :

सासष्टी, मडगाव शहरातील एसजीपीडीए किरकोळ मासळी मार्केटमध्ये सर्वत्र कचऱ्याच्या राशी दिसत असून तीव्र दुर्गंधीमुळे येथील व्यापारी आणि ग्राहक त्रस्त झाले आहेत. या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. हा कचरा त्वरित हटविला नाही, तर आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

येथे केवळ कचरा नसून थर्माकॉलच्या पेट्या, गाईंची शिंगे, मेलेली मांजरे, कुत्रीसुद्धा आहेत. आज काही समाजसेवकांनी या मार्केटला भेट देऊन येथील भयावह स्थिती पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली.

समाजसेविका वेर्मा डिमेलो म्हणाल्या की, हा कचरा रोगराईला आमंत्रण देणारा आहे. या कचऱ्याच्या राशी पाहिल्यावर कित्येक दिवस नव्हे, तर महिनोन महिने येथील कचरा उचलला नसावा, असे वाटते. संबंधित अधिकाऱ्यांनी आणि सरकारी खात्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा कचरा उचलावा.

Fish Market
Goa Loksabha Election Result: दक्षिण गोव्यात अल्पसंख्याकांची एकजूट ठरली महत्त्वाची; सासष्टीचा गड सर

येथील कचऱ्याच्या राशी आरोग्यास धोकादायक असून यापूर्वीही कित्येकदा आम्ही या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे; पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आता तर चक्क जनावरांचे सांगाडेच आणून टाकले आहेत. ही गंभीर बाब असल्याचे योगेश नागवेकर यांनी सांगितले.

परिसरातील जे लोक, व्यापारी, मच्छीमार कचरा खुल्या जागी फेकतात, त्यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. जर ही स्थिती अशीच राहिली तर मडगाववासीयांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. पावसाळा सुरू झाला असून मलेरिया, डेंग्यू यासारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. - वेर्मा डिमेलो, समाजसेविका.

Fish Market
Tigers In Goa Forest: गोव्याच्या जंगलात 'वाघ' वाढणार; सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होणार बळकट

लोकांना गृहीत धरू नका!

योगेश नागवेकर म्हणाले की, मासळी मार्केटमधील कचऱ्याच्या राशी पाहिल्या तर जिल्हाधिकारी प्रशासन, एसजीपीडीए व नगरपालिका यांचे येथील कारभारावर नियंत्रणच नसल्यासारखे वाटते. प्रशासनाने लोकांना गृहीत धरू नये. कचऱ्याच्या राशी साचून दुर्गंधी पसरणे, हे सरकारी बेजबाबदारपणाचे हे उत्तम उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वी प्रशस्त व सुंदर असे मासळी मार्केट बांधले होते. त्याची सध्या रयाच गेली आहे, अशी खंत नागवेकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com