Margao News : चौगुले कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा

Margao News : या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रम समन्वयक रवींद्र नार्वेकर यांनी स्वागत केले.
Margao
Margao Dainik Gomantak
Published on
Updated on

Margao News : मडगाव, येथील चौगुले कॉलेजच्या इंटर सायन्सच्या १९७४ च्या बॅचचा स्नेहमिलन सोहळा रविवारी रवींद्र भवनच्या ब्लॅक बॉक्समध्ये उत्साहात साजरा झाला.

यावेळी चौगुले महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीता सांखळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी शिक्षक प्रा. निर्मला व प्रा. भालचंद्र शिरवईकर, प्रा. शिवप्रसाद काकोडकर, प्रा. विजय आमोणकर व प्रा. श्रीवल्लभ रायतुरकर हे विशेष अतिथी होते. या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रम समन्वयक रवींद्र नार्वेकर यांनी स्वागत केले.

प्राचार्या संगीता सांखळकर यांनी सांगितले की, महाविद्यालयातील ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ शिक्षकांना भेटून मला आनंद झाला. सीएसआर प्रकल्प राबविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजसोबत सहकार्य करून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Margao
Best Fish In Goa: गोव्यात येताय तर मग हे 'फेमस मासे' नक्की टेस्ट करा

सर्व माजी शिक्षकांच्या वतीने प्रा. काकोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. १९७४ सालच्या सर्व गुरुजनांची व विद्यार्थ्यांची देणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.

रमाकांत कामत यांनी यासाठी मेहनत घेतली.मनोरंजनाचे संयोजन चंदू काणे आणि सुशांत कामत यांनी केले. संजय, चंद्रकुमार, सतीश, पंढरीनाथ, शुभा, रीना, अँटोनिओ आदींनी गाणी सादर केली. सूत्रसंचालन शुभा व रीना यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com