Carnival Festival : मडगावात दोन दिवस किंग मोमोचे राज्य

Carnival Festival : पहिल्या दिवशी संध्याकाळी ३.३० वाजल्यापासून चित्ररथ मिरवणुकीला बोर्डा येथील होली स्पिरीट चर्च चौकातून सुरू होईल व पालिका चौकात समाप्त होईल.
Carnival Festival
Carnival Festival Dainik Gomantak
Published on
Updated on

Carnival Festival : सासष्टी, मडगावात कार्निव्हलचे आयोजन पारंपरिक पद्धतीने केले जाणार आहे. पर्यटन खात्याने जी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत त्याचे पालन करून यंदा दोन दिवस कार्निव्हल साजरा केला जाणार आहे, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मडगाव कार्निव्हल आयोजन समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मिलाग्रीन गोम्सने सांगितले की, यंदा कार्निव्हल रविवार ११ व १२ असे दोन दिवस साजरा केला जाणार आहे. पहिल्या दिवशी संध्याकाळी ३.३० वाजल्यापासून चित्ररथ मिरवणुकीला बोर्डा येथील होली स्पिरीट चर्च चौकातून सुरू होईल व पालिका चौकात समाप्त होईल.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पालिका चौकात फॅन्सी ड्रेस स्पर्धा व संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शहर सजले

कार्निव्हल आयोजनाची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. मडगावमधील वाहतूक बेटे सजविण्यात आलेली आहेत. पालिका बाग परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला तात्पुरते लोखंडी बॅरीकेट उभारलेली आहेत.

पालिका बागेच्या सभोवताली रंगबेरंगी पताका लावण्यात आलेल्या आहेत. पालिका चौकात नागरिकांना बसण्यासाठी तंबू उभारण्यात आला असन त्यात खुर्चांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य मंच सजविण्याचे काम चालू आहे. चित्ररथ मिरवणुकीच्या वेळी चोख पोलिस बंदोबस्त असणार आहे.

Carnival Festival
Goa Water Issue: वेळुस वाळपई मुख्य रस्त्यावर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com