Margao News: खवय्यांचा हिरमोड! ६७ वर्षांपासून गोमन्तकीय खाद्यपदार्थ पुरवणारे मडगावातील हॉटेल बंद होणार?

Margao News : या हॉटेलमध्ये अस्सल गोमंतकीय पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्या, बटाटेवडे, सामोसा, बन्स, शिरा, चहा, कॉफी हे पदार्थ मिळत असे. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत या हॉटेलात सदैव गर्दी असायची.
Margao
Margao Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी, गेली ६७ वर्षे लोकांना चवदार व स्वादिष्ट खाद्य पदार्थ पुरवणारे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले ‘बॉम्बे कॅफे’ हे हॉटेल बंद होणार या वदंतेने मडगावकरांना आश्र्चर्याचा धक्काच बसला आहे.

या हॉटेलमध्ये अस्सल गोमंतकीय पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्या, बटाटेवडे, सामोसा, बन्स, शिरा, चहा, कॉफी हे पदार्थ मिळत असे. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत या हॉटेलात सदैव गर्दी असायची.

मार्केटमधील व्यापारी, ग्राहकांचे पाय याच हॉटेलकडे वळायचे. पण १९५७ साली स्वर्गीय टी. एस. लोलयेकर यांनी सुरू केलेले हे हॉटेल बंद होणार अशी वदंता सर्वत्र पसरली आहे. सिवरेज जोडणी नाही, या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने ३० मे २०२४ रोजी या हॉटेलबरोबर मडगावमधील इतर काही हॉटेल्‍स सील केली होती. मात्र बॉम्बे कॅफे सोडून इतर सर्व हॉटेले गेल्या सोमवारपासून सुरू झाली. मात्र हे हॉटेल का सुरू झाले नाही याबद्दल लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले.

Margao
Goa News: दिवसभरात गोव्यात कुठे काय घडलं? नवे DGP, पाऊस, पडझडीसह इतर ठळक बातम्या

आम्ही हे हॉटेल बंद करत असल्याचा पत्रव्यवहार हॉटेलचे मालक व भागीदार व्यंकट लोलयेकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केला असल्याचे कळते. मात्र त्यांनी अजून अंतिम निर्णय घेतला नाही. पुढील १५ दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल असे लोलयेकर यांनी सांगितले. सद्यस्थितीत हे हॉटेल पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com