Margao Accident: मडगाव येथे बसच्या धडकेत महिलेने गमावला जीव

Margao Accident: राज्यात दररोज घडणारे अपघात प्रशासन आणि सरकार दोघांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

गोव्यात अपघाताच्या घटनांमध्ये कमी होताना दिसत नाही. राज्यात दररोज घडणारे अपघात प्रशासन आणि सरकार दोघांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मडगावातील एसबीआय बँकेजवळ झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे.

महिला रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव बसने तिला धडक दिल्याने त्यात ती जखमी झाली. उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com