Congress News : महिलांना देणार वर्षाला १ लाख! काँग्रेसचे आश्‍‍वासन

Congress News : या उपक्रमामुळे महिलांची आर्थिक उन्नती तर होईलच शिवाय घरातील आणि समाजातील त्यांच्या योगदानाची दखलही घेतली जाईल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

Congress News :

मडगाव, ‘नारी न्याय’ हा देशातील महिलांसाठी न्याय आणि समानता सुनिश्‍चित करण्याच्या उद्देशाने एक सशक्तीकरण उपक्रम आहे. त्‍यात महिला सशक्तीकरणाच्या अनेक प्रभावी उपायांचा समावेश आहे.

प्रत्येक कुटुंबातील महिलांची भूमिका ओळखून, ‘महालक्ष्मी’ योजना सुरू करण्‍यात येणार आहे. त्‍याअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. या उपक्रमामुळे महिलांची आर्थिक उन्नती तर होईलच शिवाय घरातील आणि समाजातील त्यांच्या योगदानाची दखलही घेतली जाईल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

Yuri Alemao
PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

‘नारी न्याय’ हा काँग्रेसचा जाहीरनामा महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी सामर्थ्य देईल. महिलांसाठी काँग्रेसच्या पाच वचनबद्धतेवर प्रकाश टाकत आलेमाव यांनी गोव्यातील महिलांना काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

नोकऱ्यांच्या संधींमधील असमानतेवर उपाय म्हणून काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण देणार आहे. पारंपरिक अडथळ्यांना तोडून ​​हा उपक्रम महिलांचा कार्यशक्तीमध्ये समान सहभाग सुनिश्चित करेल. तसेच सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देईल, असा विश्‍‍वासही त्‍यांनी व्‍यक्त केला आहे.

तळागाळातील महिलांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण करण्यासाठी कॉंग्रेसने प्रत्येक गावात अधिकार मैत्रीची स्थापना करण्याचे ठरवले आहे. यात समर्पित सुविधाकर्ते महिलांना कायदेशीर सल्ला आणि साहाय्य मिळवून देतील. तसेच महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सक्षम बनवतील, असे आलेमाव यांनी नमूद केले.

महिलांना आर्थिक, सामाजिक, कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनविणार

नोकरदार महिलांसाठी सुरक्षित आणि आश्वासक निवासाची गरज लक्षात घेऊन वसतिगृहांची संख्या दुप्पट करण्यासाठी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे. सावित्रीबाई फुले वसतिगृहांद्वारे महिलांना घरापासून दूर राहून रोजगाराच्या संधी शोधून त्यांच्या स्वातंत्र्य आणि सक्षमीकरणाला चालना देणारे अनुकूल वातावरण तयार करतील, असे आलेमाव यांनी पत्रकात म्‍हटले आहे.

‘नारी न्याय’ हे महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या काँग्रेस पक्षाच्या वचनबद्धतेला मूर्त रुप देते. हा उपक्रम अधिक समावेशक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, जिथे प्रत्येक महिलेला तिच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होईल, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

Yuri Alemao
Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

तळागाळातील महिला कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा सन्मान करण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘नारी न्याय’अंतर्गत आशा, अंगणवाडी आणि माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट करण्याचे वचन दिले आहे. यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा वाढेल. शिवाय समुदाय कल्याणासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेतली जाईल.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com