
पणजी: मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळेपर्यंत गप्प न बसण्याचा निर्धार राजधानीतून केल्यानंतर समितीच्या पुढील कृतीवर आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
केवळ मराठीप्रेमींना हाक देऊन न थांबता समितीचे खरे कार्य आता सुरू झाले असून पुढील आठवड्यात सुकाणू समितीची बैठक होणार असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात येईल, अशी माहिती निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली.
मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आयोजित केलेल्या सोमवारी आयोजित निर्धार मेळाव्याला मराठीप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली.
प्रा. वेलिंगकर यांनी स्पष्ट केले की, पुढील आठवड्यात सुकाणू समितीची बैठक आयोजित केली जाणार असून, या बैठकीत तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात येईल. या समित्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, प्रत्येक तालुक्यात ५० ते १०० मराठीप्रेमींना एकत्रित करून व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. कलाकार, नाट्यसंस्था, संगीतकार, कवी, लेखक, महिला, युवक यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.
समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी करणार आहे. तालुका समित्या स्थापन झाल्यावर पंचायत पातळीवर प्रचार आणि जनजागृती मोहीम सुरू केली जाणार आहे. राज्यातील १७० पंचायतांमध्ये मराठीचा प्रसार करण्यात येईल, साष्टी विभाग वगळता सर्व भागांमध्ये जागरूकता वाढवली जाणार आहे. साष्टीमध्ये मराठी प्रेमी कमी असल्याने त्यांना जवळील बैठकांमध्ये बोलावले जाईल, असेही प्रा. वेलिंगकर यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.