Gomantak Marathi Academy Election : गोमंतक मराठी अकादमीचे 27 ऑगस्टला मतदान

अकादमीच्या सभागृहात होणाऱ्या आमसभेत सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे.
Gomantak Marathi Academy Voting on 27 th August
Gomantak Marathi Academy Voting on 27 th AugustDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : गोमक मराठी अकादमीच्या आमसभा सदसत्वाच्या जागा रविवार, 27 ऑगस्ट 2023 रोजी रिक्त होणार आहेत. त्‍याच दिवशी सकाळी 10 वाजता पर्वरी येथील अकादमीच्या सभागृहात होणाऱ्या आमसभेत सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे.

भरावयच्या जागा पुढीलप्रमाणे :

गट क्र. 1 : गोवा विद्यापीठ, गोव्यातील महाविद्यालये, गोव्यातील उच्च माध्यमिक, गोव्यातील माध्यमिक व गोव्यातील प्राथमिक विद्यालये यांचे प्रतिनिधी २ जागा; गट क्र. 3 : गोव्यात राहत असलेले मराठी साहित्यिक 3 जागा; गट क्र. 4 : मराठीच्या अभिवृद्धीसाठी झटणाऱ्या गोमंतकीय संस्थांचे प्रतिनिधी 1 जागा; गट क्र. 6 : मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी झटणारे गोमंतकीय समाजकार्यकर्ते २ जागा; गट क्र. 10 : आमसभा आपल्या इच्छेनुसार अकादमीच्या कार्यास पोषक ठरतील अशा व्यक्तींची आमसभेत नावे सुचवून निवडलेला सदस्य 1 जागा. तसेच आमसभेतून अध्यक्ष 1 जागा, उपाध्यक्ष १ जागा, कार्यकारी मंडळ 1 जागा यांची निवडणूक घेऊन भरण्यात येईल. निवृत्त झालेले किंवा होत असलेले सदस्य पुन्हा निवडणुकीला उभे राहू शकतात.

Gomantak Marathi Academy Voting on 27 th August
Smart City Panaji - स्मार्ट सिटी निधीच्या 550 कोटींचा हिशोब कुठे? - पालेकर | Gomantak TV

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

  • उमेदवारी अर्ज देण्याची व स्वीकारण्याची मुदत रविवार व सुट्टीचे दिवस वगळून 1 ते 12 ऑगस्ट 2023 पर्यंत दुपारी 2 ते सायं. 5 वाजेपर्यंत.

  • उमेदवारी अर्जाची छाननी 14 ऑगस्ट 2023 रोजी सायं. 5 वाजता केली जाईल. त्यांनतर त्याचदिवशी निडणूक लढविण्यास पात्र असलेल्या उमेदवारांची यादी अकादमीत उपलब्ध असेल.

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 16 ते 17 ऑगस्ट 2023 दुपारी 2 ते सायं. 5 वाजेपर्यंत राहील. निवडणुकीस पात्र असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी 18 ऑगस्ट 2023 रोजी सायं. 5 वाजता सूचना फलकावर लावण्यात येईल.

  • रविवार, 27 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता गोमंतक मराठी अकादमीच्या पर्वरी येथील सभागृहात होणाऱ्या आमसभेत अकादमीचे सदस्य निवडण्यासाठी मतदान होईल.

  • 1 ते 12 ऑगस्ट 2023 पर्यंत नामांकन पत्र भरून गोमंतक मराठी अकादमीकडे सुपुर्द करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com