Mapusa News : राज्यातील शाळांची वेळ बदलण्यास तीव्र आक्षेप; संजय बर्डे यांची टीका

Mapusa News : व्यावसायिकरणाला चालना देण्याचा भाजपचा डाव
Mapusa
Mapusa Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News :

म्हापसा, राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत, राज्य सरकार शाळांची वेळ बदलण्याच्या तयारीत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत वर्ग चालवू पाहते. ही संकल्पना मार्गी लावण्यापूर्वी सरकारने सारासार विचार करण्याबरोबरच पालकांना विश्वासात घेतले पाहिजे.

कारण, सरकारचा चुकीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या दिनचर्येसोबत त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतो, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डेंनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.

सध्या काही शाळांमध्ये माध्यान्ह आहार दिला जातो, मात्र या खाद्याच्या गुणवत्तेवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. त्यात, सरकारने सायंकाळी चार वाजेपर्यंत शाळा चालविण्याचे ठरवल्यास मुलांच्या भोजनाचा विषय ऐरणीवर येईल. सरकार प्रत्येक गोष्टीचे व्यावसायिकरण करू पाहतेय. शाळांच्या वेळेत बदल केल्यास सरकार माध्यान्ह आहारासाठी कंत्राटदार नेमणार, मग त्यात व्यावसायिकरण आले.

मात्र, विद्यार्थ्यांना सकस आहार मिळणार याची हमी आहे का? असा प्रश्नही बर्डेंनी उपस्थित केला.

सोमवारी (ता.१७), म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समाजकार्यकर्ते सचिन किटलेकर, दीपेश नाईक, अनिल केरकर व सितेश मोरे हे उपस्थित होते.

सचिन किटलेकर म्हणाले की, सरकारने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेणे चुकीचे

आहे.

Mapusa
Goa Politics: गोविंद गावडेंचे गच्छंती अटळ? सावर्डेकरांची गणेश गावकरांसाठी मंत्रीपदाची मागणी

सरकार हे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळखंडोबा करू पाहत आहे. सध्या ‘नीट’च्या निकालावरुन देशभरात मोठे वादळ निर्माण झाले आहे. ‘नीट’ परीक्षा हा मोठा घोटाळा असून यापुढे नीट परीक्षा बंद कराव्यात. त्याऐवजी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा मार्गी लावावी.

- दीपेश नाईक,

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com