Mapusa News : श्री देव बोडगेश्‍‍वर मंदिर पुन्हा लक्ष्य ; सिनेस्‍टाईल चोरी

Mapusa News : सुरक्षारक्षकाला बांधून मध्‍यरात्री डल्ला; भाविकांमध्ये खळबळ
Mapusa
MapusaDainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा येथील प्रसिद्ध व जागृत श्री बोडगेश्‍‍वर देवस्थानातील दोन फंडपेट्या फोडून चौघा अज्ञात चोरट्यांनी सुमारे १० ते १२ लाख रुपयांची रोकड पळविली. ही घटना आज सोमवारी पहाटे मध्यरात्री दोन ते अडीचच्‍या दरम्‍यान घडली.

चोरट्यांनी मंदिराच्या मागच्‍या बाजूने शिरकाव करत आधी मंदिरात झोपलेल्या वयस्कर सुरक्षारक्षकाला ओलीस ठेवले आणि त्यानंतर मंदिरातील फंडपेट्या फोडल्या. दरम्यान, संशयितांनी रेकी करून ही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्‍यक्त केलाय.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चौघा चोरांनी मंदिरात प्रवेश केला तेव्हा मंदिरातच देव बोडगेश्वराच्या मूर्तीच्या पाठीमागील बाजूने ६१ वर्षीय दशरथ ठाकूर हे सुरक्षारक्षक झोपले होते. चोरट्यांनी त्‍यांना ओलीस ठेवूत जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय त्यांच्याच अंगावरील शर्ट काढून त्यांचे हात बांधले. त्यानंतर दोन चोरट्यांनी बोडगेश्वराच्या मूर्तीसमोरील व मागील अशा दोन फंडपेट्या फोडल्या.

Mapusa
Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

मंदिरातील तिसरी दानपेटीही फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. यातील दोघा चोरट्यांनी जॅकेट परिधान केले होते, तिसऱ्याने टोपी तर चौथ्याने आपला चेहरा रुमालाने झाकला होता.

चोरांनी दोन्ही दोनपेट्यांमधील पैशांवर डल्ला मारून पोबारा केला. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी सुरक्षारक्षक दशरथ ठाकूर यांच्या तक्रारीच्या आधारे संशयितांविरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.

१ दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे २८ फेब्रुवारी २०२४ रोजी मंदिरसमोरील श्री बोडगेश्‍‍वराच्‍या पादुकांची पेटी फोडून चोरट्यांनी काही पैसे चोरले होते. याप्रकरणी तासाभरात म्हापसा पोलिसांनी कर्नाटकमधील दोघा संशयितांना अटक केली होती.

२ मध्यंतरी सदर चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी देवस्थान समितीला आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना केली होती. दानपेट्यांना सुरक्षा अलार्म सिस्टम बसविली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती, असे पोलिससूत्रांनी सांगितले.

चोरटे सीसीटीव्‍हीत कैद, पण…!

संशयित मध्यरात्री २ वाजून ५ मिनिटांनी मंदिरात प्रवेश केला आणि २.३८ मिनिटांपर्यंत आपले काम साध्‍य करून तेथून पोबारा केला. त्यानंतर २ वाजून ४० मिनिटांनी एक भाविक मंदिरात दर्शनासाठी आला असता प्रदक्षिणा घालताना त्याला सुरक्षारक्षक हात बांधलेल्या स्थितीत आढळला.

त्याने लगेच याबाबत मंदिराच्या आवारात राहणाऱ्या संबंधितांना याची कल्पना दिली व कालांतराने म्हापसा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मंदिरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तसापले. यात संशयित चोरी करताना दृष्टीस पडताहेत, परंतु सीसीटीव्ही कॅमेरे ‘हाय रिझोल्युशन’चे नसल्याने चोरांचे चेहरे स्‍पष्‍ट दिसत नाहीयत.

श्री बोडगेश्‍‍वर मंदिरातील दोन फंडपेट्या चोरट्यांनी फोडून सुमारे १० ते १२ लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज आहे. मुळात पोलिसांनी मध्यरात्रीच्या वेळी मंदिरस्थळी गस्त घालण्याची गरज आहे. संशयितांनी रेकी करूनच नियोजनबद्धरित्या ही चोरी केली आहे. दर चार महिन्यांनी फंडपेट्या उघडून त्यातील पैसे आम्‍ही बाहेर काढतो.

- अ‍ॅड. वामन पंडित, सचिव, श्री बोडगेश्वर देवस्थान समिती)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com