Mapusa News : म्हापशात समाजकार्यकर्ते एकवटले; वादग्रस्त शेड बांधकामाला आक्षेप

Mapusa News : राजकीय नेत्यांनी स्मशानभूमीची जागा बळकावल्याचा दावा
Mapusa
Mapusa Dainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा, दत्तवाडी-म्हापसा येथील स्मशानभूमी शेजारील खुल्या जागेत वर्कशॉप उभारण्यासाठी शेडचे बांधकाम सुरु आहे. हे शेड सत्ताधारी लोकप्रतिनिधीचे असून या शेडच्या माध्यमातून स्मशानभूमीची जागा बळकावण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप समाजकार्यकर्त्यांनी केला आहे.

ही जागा पूर्ववत करून उभारलेले शेड हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी संजय बर्डे, शंकर पोळजी, जितेश कामत, रामा काणकोणकर, अनिल केरकर, दीपेश नाईक, सितेश मोरे, सुदेश तिवरेकर आदी उपस्थित होते.

जितेश कामत म्हणाले की, भाजपमधील लोकप्रतिनिधीच अशाप्रकारे गैरप्रकारास खतपाणी घालत आहेत. हेच इतर कुठल्या व्यक्तीने किंवा दुसऱ्या धर्मातील व्यक्तीने केला असता, तर त्याच्या मागे प्रशासकीय यंत्रणेचा समेमिरा लावला असता. त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले असते.

संजय बर्डे म्हणाले की, लोकांनी आवाज उठविताच म्हापसा पालिकेने शेडचे बांधकाम बंद ठेवण्यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी केली; परंतु ही नोटीस मूळ मालकाऐवजी संबंधित कंत्राटदारास काढली आहे. त्यामुळे बर्डे यांनी कारवाईवर संशय व्यक्त केला.

कारस्थानात नेतेमंडळींचा हात

शंकर पोळजी म्हणाले की, सरकारमधील नेतेमंडळीच आता स्मशानभूमीची जागा बळकावू पाहताहेत. हा प्रकार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. रामा काणकोणकर म्हणाले की, कोविड काळात सरकारने व्हेंटिलेटरच्या नावाने कथित पैसे लाटले.

Mapusa
Goa's Three Controversy: शांतादुर्गा, कोकण रेल्वे, फार्मा नोकरभरती; आठवडा गाजवणाऱ्या गोव्यातील तीन घटना

आता स्मशानभूमीच्या जागेत बेकायदा बांधकाम सुरू आहे. एकीकडे सरकार हिंदुत्वाच्या गप्पा मारते अन् लोकप्रतिनिधी स्मशानभूमीची जागा हडप करू पाहताहेत. मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com