Mapusa News : जीवनाच्या परीक्षेत नंबर मिळवला, तर पुढील आयुष्यात आनंद : मनोज कामत

Mapusa News : बोडगेश्वर संस्थानात त्वष्टा ब्राह्मण समाजोत्कर्ष संस्थेतर्फे युवक मेळावा उत्साहात
Mapusa
MapusaDainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा दहावीनंतरची पाच वर्षे मुलांच्या जीवनात महत्त्वाची आहेत. ही पाच वर्षे फक्त मजा मारली तर आयुष्य फुकट जाईल. त्यासाठी अथक प्रयत्न, परिश्रम करून आपले ध्येय साध्य करा.

जीवनाच्या परीक्षेत पहिला नंबर मिळवला तरच पुढील आयुष्य आनंदाने घालवता येईल, असा सल्ला प्रा. डॉ. मनोज कामत यांनी दिला.

येथील श्री देव बोडगेश्वर संस्थानाच्या सभागृहात त्वष्टा ब्राह्मण समाजोत्कर्ष संस्थेने आयोजित केलेल्या ज्ञाती युवक मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष नरेश तिवरेकर, किशोर शहा, अभिजित बुक्कम, अध्यक्ष गजानन सावंत, सचिव शिवनाथ सावंत, युवा अध्यक्ष हिमांशू तिवरेकर आदी उपस्थित होते.

Mapusa
Stray Dogs On Goa Beach: बॉलिवूडची अभिनेत्री, रशियन महिलेला बीचवर भटक्या कुत्र्याने घेतला चावा, पर्यटक दहशतीखाली

कामात पुढे म्हणाले की, आपण कोणाच्या घरी जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसते, परंतु पुढे स्वकष्टाने कोणाच्या पंक्तीला बसणे हे तुमच्या हाती आहे. धोनी, गावस्कर, डॉ. माशेलकर, राष्ट्रपती अब्दुल कलाम तुमच्यातूनच घडू शकतात. सिनेमातील हीरो हीरोइन तुमचे रोल मॉडेल नसावेत. आपले भविष्य घडवताना आई-वडिलांच्या कष्टांचा विचार करा, आपली मुले मोठी व्हावीत म्हणून श्रम करणाऱ्या पालकांचे स्वप्न पूर्ण करा. तुमच्या आईच्या डोळ्यातील अश्रूंचे तीर्थ बनवा, असे आवाहन केले.

दुसऱ्या सत्रात किशोर शहा तर तिसऱ्या सत्रात अभिजित बुक्कम यांनी व्यवहार चातुर्य आणि व्यवहारात यशस्वी होण्यासाठी जे गुण लागतात त्याबद्दल दृकश्राव्य माध्यमातून माहिती दिली.

लाडू बनवण्याच्या स्पर्धेत संगीता एकवडे प्रथम

या मेळाव्यात लाडू बनवण्याची स्पर्धा दुपारच्या वेळी घेण्यात आली. या स्पर्धेत संगीता एकवडे (पिसुर्ले) यांना प्रथम, उमा (शिवोली), तर मधुरा श्रीवंत

( कुंकळी) यांना तृतीय पारदर्शक मिळाले. वंदना लांजेकर,कल्पना साळवी, शकुंतला केरकर, आदिती धामस्कर, अमिता तिवरेकर व सारिका लांजेकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com