Mapusa News : म्हापशात गुढी पाडवा उत्सवानिमित्त शोभायात्रा

Mapusa News : निरगुडकर यांचे ‘राममंदिर ते राष्ट्रमंदिर’ विषयावर भाषण
Mapusa
Mapusa Dainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा, नववर्ष स्वागत समिती म्हापसातर्फे ९ एप्रिल रोजी सार्वजनिक गुढी पाडवा उत्सव येथील टॅक्सी स्टॅण्डवर साजरा करण्यात येणार आहे. पहाटे भव्य शोभायात्रा हे या उत्सवाचे खास आकर्षण असेल.

पत्रकार परिषदेत कार्यवाह प्रशांत बर्वे म्हणाले की, गुढी पाडव्यानिमित्त पहाटे ५ वा. विविध प्रभागांतील शोभायात्रांना प्रारंभ होईल. ५.१५ वा. श्री मारुती मंदिराजवळ सर्व शोभायात्रांचे एकत्रिकरण होऊन भव्य शोभायात्रेस सुरवात होईल. शहराला वळसा घेत टॅक्सी स्टॅण्डवर शोभायात्रेची सांगता होईल.

यात्रेत लेझीम पथक, दिंडीपथकासह ढोलपथकाचा समावेश असेल. टॅक्सी स्टॅण्डवर मुले वेशभूषा सादर करतील. सकाळी ६ वा. सार्वजनिक गुढी उभारणी, त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे ‘राममंदिर ते राष्ट्रमंदिर’ या विषयावर भाषण होईल, अशी माहिती महेश कोरगावकर यांनी दिली.

Mapusa
Goa Cashew Farmers: काजू उत्पादनात घट! राज्यातील शेतकरी चिंतातुर, हमीभाव वाढवण्याची मागणी

या पत्रकार परिषदेस भूषण गावडे, रितेश नेवगी, माया शिरोडकर, विजय तिनळेकर, सुधांशू साळवी, कौस्तुभ नाटेकर, आदित्य मिशाळ, समीर शिरोडकर, सागर खलप, संदीप आजगावकर, दर्शन शेट्ये, संतोष गावडे, योगेंद्र मांद्रेकर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com