Domnic D'Souza Case: मोठी बातमी! म्हापसा न्यायालयातर्फे डॉम्निक डिसोझाला सशर्त जामीन मंजूर

डॉम्निक डिसोझा याने फोंडा येथील 40 वर्षीय इसमाला धर्मांतरासाठी धमकावले होते
Domnic D'Souza Case
Domnic D'Souza CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa court granted conditional bail to Five pillar church Domnic D'Souza in illegal conversation case

फसवणूक आणि बेकायदेशीर धर्मांतरण घडवून आणण्याच्या आरोपाखाली सडये, शिवोलीमधील बिलिव्हर्सच्या डॉम्निक डिसोझा व जोन मस्करेन्हास यांच्यावर गुन्हा नोंदवून संशयित डॉम्निक यास म्हापसा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली. मात्र आज (4 जानेवारी) म्हापसा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Domnic D'Souza Case
Goa Crime News: मोरजीत ड्रग्जप्रकरणी पोलिसांची कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

डॉम्निक डिसोझा याने फोंडा येथील 40 वर्षीय इसमाला धर्मांतरासाठी धमकावले. तसेच फिर्यादीस संशयितांनी सांगितलेला आणि प्रचारित केलेला धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवले, असेही कथित आरोप तक्रारीत करण्यात आले.

मागील दोन दिवसापासून डिसोझा पोलीस कोठडीत होता. त्यात अजून एका दिवसाची वाढ झाली करण्यात आली होती. मात्र आज अचानक त्याला जामीन मंजूर केल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com