Goa Crime News: मोरजीत ड्रग्जप्रकरणी पोलिसांची कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड(एनसीबी)ने बुधवारी केलेल्या कारवाईत एका तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करून 8 जणांना अटक केली.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik gomantak

Goa Crime News: नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड(एनसीबी)ने बुधवारी केलेल्या कारवाईत एका तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करून 8 जणांना अटक केली. तस्करांची ही टोळी म्यानमारहून श्रीलंकेला व्हाया इंफाळ, गुवाहाटी आणि चेन्नईमार्गे मेथॅफेटामाईन हा अंमलीपदार्थ नेत होते. 15.8 किलोचा हा अंमलीपदार्थ साठा या तस्करांच्या टोळीकडून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला.

Goa Crime News
Goa Untimely Rain: गोव्यात अचानक कोसळल्या पावसाच्या सरी! मडगाव, कोलवा, नावेलीत पावसाची एंट्री; पहा व्हिडिओ

तर दुसरीकडे, गुन्हा शाखेने मोरजी येथेच छापा टाकून एकाला अटक केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, काल खिंड गार्डन परिसरात किशोर चव्हाण (27, कर्नाटक) हा युवक ड्रग्जतस्करीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचत दुपारी संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3.72 किलो गांजासह 3.15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com