Mangroves : समृद्ध समुद्री जीवनाचे प्रतीक

निसर्गसंवर्धनात अग्रेसर : किनारपट्टीचे संरक्षण करण्‍याबरोबरच जलचरांना आसरा
mangroves in goa
mangroves in goaDainik Gomantak
Published on
Updated on

World Environment Day 2023 : समुद्र, नदी-नाल्‍यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी खारफुटी अनेक अर्थाने महत्त्‍वपूर्ण आहे. समुद्रातील वादळ, लाटांपासून किनारपट्टीच्या संरक्षणाबरोबर लाखो, करोडो समुद्रजीवांचा तो आधिवास आहे.

सागरी किंवा समुद्री पर्यावरणात मँग्रूव्‍हज अर्थात खारपुटीला अनन्यसाधारण असे स्थान आहे. खारफुटी किनारपट्टीचे संरक्षण करतातच पण त्याबरोबर नवीन जमीन बनवितात. या खारफुटीच्या झाडांचे वैशिष्ट्ये असे की, ती खऱ्या अर्थात समुद्राच्या खाऱ्या पाण्यात उगवतात आणि खाऱ्या पाण्यातील अन्नद्रव्य शोषून त्यावर वाढतात.

mangroves in goa
Goa Monsoon Update: गोव्यात पाऊस लांबणार? अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानात बदलाची शक्यता

त्यामुळे ही एकमेव वनस्पती समुद्राच्या पाण्यात, काठावर, किनारपट्टीवर आढळते. ही वनस्पती जलचर परिसंस्थेचा जणू आत्माच आहे. वादळे, सुनामी, महापूर यापासून किनारपट्टीचे संरक्षण, जलचरांना आसरा आणि अन्न देण्याचे महत्वाचे काम ही वनस्पती करते.

खारफुटी तोडण्‍यावर वन्यजीव कायदयाने बंदी असली तरी अनेक ठिकाणी तिची खुलेआम कत्तल सुरू आहे. जगभरातील खारफुटीचा विचार केला तर दक्षिण आशियात तिचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने इंडोनिशिया, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका या देशांत त्‍या विपुल प्रमाणात आढळतात. भारतात पूर्व किनारपट्टीवर सर्वाधिक 80 टक्के खारफुटी आढळते. पश्चिम किनारपट्टीवरही तिचे प्रमाण अधिक आहे. गोव्‍यासह केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातमध्ये  खारफुटी  सापडते.

mangroves in goa
Goa Drugs Case : मोरजी येथे अडीच लाखांचे ड्रग्स जप्त

अनेक जीवांचे आश्रयस्थान

खारफुटी ही अनेक प्राणी, पक्षी, जलचर, उभयचर प्राण्यांचे आश्रयस्थान आहे. समुद्रातील बहुतांश जलचर आश्रयासाठी आणि अंडी घालण्यासाठी, उबवण्यासाठी येतात. यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे, खेकडे, कोळंबी, जेलीफिश, तिसऱ्या, कालवे यांचा समावेश आहे.

तर, या जलचरांवर जगणारे समुद्र पक्षीही इथे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्‍यात बगळे, करकोच, स्टीलट, वेगवेगळ्या प्रकारची बदके यांचा समावेश आहे. शिवाय कोल्हे, लांडगे, पानमांजर, बिबटे अगदी पट्टेरी वाघही खारफुटीत आढळतात.

जगभरात 40 पेक्षा जास्त खारफुटीच्या प्रजाती आढळतात. त्‍यातील भारताच्या किनारपट्टीवर २८ प्रजाती आहेत. यापैकी १५ जाती गोव्याच्या किनारपट्टीवर आढळून येतात. यातील बहुतांश प्रजाती डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यात दिसून येतात.

- आनंद जाधव, उत्तर गोवा उपवनसंरक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com