Mandrem Mega Project News
Mandrem Mega Project VillasCanva

Mandrem: ग्रामस्थांचा विरोध डावलून 18 व्हिला, 70 फ्लॅट्सना मंजुरी; मांद्रेवासीय आक्रमक, सरपंचांच्या राजीनाम्याची केली मागणी

Mandrem Mega Project: मांद्रे पंचायत क्षेत्रात मेगा प्रकल्प आणि व्हिला उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध असतानाही सत्तारूढ पंचायत मंडळाने या व्हिला आणि मेगा प्रकल्पांना परवाने दिले.
Published on

मोरजी: मांद्रे पंचायत क्षेत्रात मेगा प्रकल्प आणि व्हिला उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध असतानाही सत्तारूढ पंचायत मंडळाने या व्हिला आणि मेगा प्रकल्पांना परवाने दिले. यामुळे जागृत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करून आता सरपंच राजेश मांद्रेकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

मांद्रे पंचायत क्षेत्रात एखादा मेगा प्रकल्प किंवा व्हिला उभारायचा असल्यास दर ग्रामसभेत ग्रामस्थ पंचायत मंडळाला लेखी ठरावाद्वारे तशा प्रकारचे प्रकल्प असेल तर ग्रामस्थांना ग्रामसभेत पूर्वकल्पना द्यावी. आणि त्या प्रकल्पाचे लोकांना फायदा,तोटा याची माहिती द्यावी. अशी वेळोवेळी मागणी केली जायची.

या मागणीकडे दुर्लक्ष करत पंधरा दिवसांपूर्वी मांद्रे पंचायत मंडळाची महत्त्वाची बैठक राजेश मांद्रेकर यांच्या नेतृत्वात पंचायत कार्यालयात झाली. त्यावेळी आश्वे मांद्रे येथे एकूण १८ व्हिला बांधकामांना परवानगी आणि जूनस वाडा मांद्रे येथे एकूण ७० फ्लॅट उभारण्यास परवानगी देणारे ठराव मंजूर केले होते.

Mandrem
MandremDainik Gomantak

या बैठकीची आणि व्हिलांना मंजुरी दिल्याची माहिती जागृत ग्रामस्थांना कळताच त्याच दिवशी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या.

सरपंच राजेश मांद्रेकर हे ग्रामस्थांचा विरोध डावलून गावच्या हिताविरोधात निर्णय घेतात, त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी संतापलेल्या ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

Mandrem Mega Project News
Mandrem: मुंडकारांच्या जागेत 40 बाऊन्सरसह कुंपणाचे काम! मांद्रेत तणाव; पंचायतीची नोटीस

राजेश मांद्रेकर,सरपंच

आपण एकट्याने या प्रकल्पांना मंजुरी दिलेली नाही. बहुमताने ठराव मंजूर झाला. शिवाय अगोदरच सरकारकडून सर्व सरकारी खात्याकडून या व्हिलाना कायदेशीर परवाने मिळालेले असून आम्ही कायदेशीरच परवाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com