Harmal News : मांद्रे-जुनसवाडात पदपुलाचे पत्रे तुटले; लोखंडी पदपुलाची दुर्दशा

Harmal News : किमान दोन तीन वर्षानंतर स्टील पदपुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असते. पदपुलाचे काम लोखंडी व वेल्डिंगचे असल्याने, तसेच लोखंडाला गंज चढत असल्याने त्याची दुरुस्ती व देखभाल संबधित खात्याने करणे गरजेचे होते.
Harmal
HarmalDainik Gomantak

Harmal News :

हरमल, मांद्रे जुनसवाडा फॉरेस्ट पार्कमधून समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी असलेल्या पदपुलावरील पत्रे तुटले असून हा पदपूल धोकादायक बनला आहे. हा पदपूल तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी पर्यटक व स्थानिकांतून होत आहे.

किनाऱ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना सोयीचे व्हावे यासाठी हा पदपूल महत्त्वाचा आहे. शिवाय त्याठिकाणी फॉरेस्ट पार्क असल्याने बच्चे कंपनीला पार्क मधील मस्तीनंतर किनाऱ्यावर जाऊन मौजमजा करणे सोपे होते. मात्र, या पदपथावरील पत्र्याच्या जोडणीचे ( जॉईंट ) तुटल्याने पादचाऱ्यांच्या पायात अडकून जखमी होण्याची भीती व्यक्त होत असल्याचे नागरिक अमेय नाईक यांनी सांगितले.

किमान दोन तीन वर्षानंतर स्टील पदपुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असते. पदपुलाचे काम लोखंडी व वेल्डिंगचे असल्याने, तसेच लोखंडाला गंज चढत असल्याने त्याची दुरुस्ती व देखभाल संबधित खात्याने करणे गरजेचे होते.सध्या गंज चढून जोडणी निखळत असल्याने हे धोकादायक ठरण्याची शक्यता नाईक यांनी व्यक्त केली.

Harmal
Goa Politics: राहुल गांधी तुम्हीच सांगा! विरियातोच्या संविधानाबाबत वक्तव्यवरुन विनोद तावडेंची मागणी

याबाबत संबधित खात्याने एखाद्या गरज सुविधेचे लोकार्पण केल्यानंतर त्या विकासकामांची देखभाल कोणी करायची यासाठी खास नियमावली लागू केली पाहिजे, असे मत स्थानिक नागरिक रामकृष्ण माज्जी यांनी व्यक्त केले.

दरम्यान,माजी आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळचे चेअरमन दयानंद सोपटे यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या कामाची नंतरच्या काळात खात्याने देखरेख केली नाही, याबाबत नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे.

तरी संबधित पर्यटन खात्याने या पदपुलाचे काम प्राधान्याने हाती घेऊन नागरिक पादचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

पदपुलाची तातडीने दुरुस्ती करा !

पदपुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याचे सदर स्थितीवरून दिसून येते. संबंधित बांधकाम खात्याने या पदपुलाच्या स्थितीची दखल घेऊन तातडीने दुरूस्तीचे काम हाती घ्यायला हवे,अशी मांद्रे आणि जुनसवाडा परिसरातील रहिवाशांची तसेच या पदपुलाचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांकडून होत आहे.

विदेशी पर्यटकांनाही या पदपुलाचा वापर करावा लागतो. त्यांनीही पदपूल दुरूस्तीची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com