Margao: बड्डे-मडगावमध्ये सराफी दुकानात थरार! ग्राहक बनून आलेल्या इसमाकडून व्यापाऱ्यावर हातोड्याने हल्ला, संशयित CCTV कॅमेऱ्यात कैद

Madgaon Jeweller attack: बड्डे-मडगाव येथील एका सराफी दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका इसमाने दुकान मालक सोहन रायकर (२३) याच्‍यावर हातोड्याने प्राणघातक हल्ला केल्‍याने सगळ्‍याच सराफांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Margao
MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Jewellery Theft Attemp : बड्डे-मडगाव येथील एका सराफी दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका इसमाने दुकान मालक सोहन रायकर (२३) याच्‍यावर हातोड्याने प्राणघातक हल्ला केल्‍याने सगळ्‍याच सराफांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्‍लेखोराची छबी सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, त्याआधारे या प्रकरणाचा तपास केला जात आहे. फातोर्डा पोलिसांबरोबर क्राईम ब्रँचचेही एक पथक या हल्‍लेखोराचा तपास करीत आहे.

काल सायंकाळी उशिरा बड्डे-मडगाव येथील देवराय इंदिरा ज्वेलर्स या सराफी दुकानात हा हल्‍ला झाला होता. सदर हल्लेखोर तोंडावर मास्‍क घालून दुकानात आला होता. या हल्‍लेखोराने सोहन रायकर याच्‍यावर हल्‍ला केला असला तरी कुठल्‍याही प्रकारची चोरी करण्‍याचा प्रयत्‍न केला नव्‍हता.

त्‍यामुळे हा हल्‍ला चोरीसाठी, की आणखी कुठल्‍या कारणासाठी याचाही तपास पोलीस करत आहेत.फातोर्डाचे पोलिस निरीक्षक नेथन आल्‍मेदा यांना विचारले असता, आम्‍ही सर्व अंगाने तपास करीत आहोत. हा हल्‍ला करण्‍यामागे चोरी व्‍यतिरिक्‍त आणखी काही कारण आहे का? हेही तपासून पहात आहोत, असे त्‍यांनी सांगितले.

Margao
Goa Assembly Session: अर्थसंकल्‍प चिप्‍स पाकिटासारखा नव्‍हे, चतुर्थीच्‍या माटोळीसारखा! गोविंद गावडेंसह विरोधकांना CM सावंतांचा टोला

दोन दिवसांपूर्वी चांदर येथे एका वृद्धावर असाच हल्‍ला करून त्‍याच्‍या घरातील १२ लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते. या घटनेचा या बोर्डातील घटनेशी काही संबंध आहे का?असे विचारले असता, अद्याप तरी तसा संबंध दिसत नाही. बोर्डा येथे जो हल्‍ला झाला त्‍या हल्‍लेखोराने कुठल्‍याही प्रकारचा चोरीचा प्रयत्‍न केल्‍याचे आढळून आले नाही असे त्‍यांनी सांगितले.

फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात संशयितावर भारतीय न्याय संहितेच्या ११८ (१) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. देविदास हे पुढील तपास करीत आहेत. 

सोहन रायकर यांच्या मालकीच्या देवराय इंदिरा ज्वेलर्स या दुकानात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. एक इसम या दुकानात आला होता. त्याने आपला चेहरा मास्कने  झाकला होता, त्याच्या हातात एक बॅगही  होती. आपल्या आईचे दागिने असल्याचे सांगून, ते नव्याने करून घ्यायचे  आहे असे तो सांगत होता. संशयिताचे एकूण वागणे संशयास्पद होते. काही कळण्याच्या अगोदर त्याने सोहनवर हातोड्याने वार करणे सुरू केले. यावेळी त्या दोघांची झटापटही झाली.

Margao
Goa Crime: घात की अपघात? वास्को रेल्वे रुळाजवळ आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

त्याच्याकडे एक चाकूही  होता. तो त्याने तेथेच  टाकून नंतर पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर  फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी  जाऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅब व श्वान पथकांनाही बोलावून घेण्यात आले. संशयित चोरीच्या हेतूनेच  आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या गुन्हा नोंद केला असून तपास चालू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आल्मेदा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com