Malpe Landslide : मालपेतील दरड ‘जैसे थे; प्रशासनाचा हलगर्जीपणा

Malpe Landslide : वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली तरी हा नवीन बगल मार्ग बनविताना झालेल्या रचनेमुळे नवीन बगल मार्गावरून जुन्या मार्गावर अवजड वाहनांना चढणे शक्य नसल्याने या ठिकाणी अनेक मालवाहू ट्रक, कंटेनरसारखी अवजड वाहने दरड कोसळल्यामुळे अडकून पडली आहेत.
Malpe Landslide
Malpe LandslideDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे, मालपे येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वर कोसळलेली दरड अद्याप हटविण्यात आली नाही. पाच दिवस उलटले तरीसुद्धा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी काहीच काम करण्यात आले नाही. त्यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता आहे.

वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली तरी हा नवीन बगल मार्ग बनविताना झालेल्या रचनेमुळे नवीन बगल मार्गावरून जुन्या मार्गावर अवजड वाहनांना चढणे शक्य नसल्याने या ठिकाणी अनेक मालवाहू ट्रक, कंटेनरसारखी अवजड वाहने दरड कोसळल्यामुळे अडकून पडली आहेत.

न्हयबाग -पोरस्कडे येथे दरड कोसळल्याने आता जुन्या मार्गाने वाहने वळविण्यात आली, तरी नवीन बगल मार्ग तयार करण्यात आलेला मार्ग हा जुन्या मार्गापेक्षा खाली गेला असून जुन्या मार्गावर वाहने वळविण्यासाठी करण्यात आलेल्या मार्गावर वळण व चढाव तयार झाला असल्याने या जुन्या मार्गावर अवजड वाहने चढू शकत नसल्याने या ठिकाणी गेल्या पाच ते सहा दिवसापासून दिवसापासून अनेक ट्रक व कंटेनरसारखी मालवाहू वाहने अडकून पडलेली असून दरडी काढण्याची ते वाट पहात आहेत.

Malpe Landslide
Dr N Kalaiselvi यांची CSIR आणि DSIR च्या महासंचालक पदी नियुक्ती; प्रथमच एका महिलेला संधी

यापूर्वी २५ जून रोजी एका बाजूची दरडी कोसळल्यामुळे एका बाजूचा मार्ग बंद करण्यात आला, तरी दुसऱ्या बाजूने अवजड वाहने नेता येत असत. पण नंतर पडलेल्या दरडीची व्याप्ती मोठी असल्याने या दरडीमुळे संपूर्ण मार्गच व्यापलेला आहे. ही दरडी काढली तर या दरडीच्या आधारावर असलेला डोंगराचा आणखी काही भाग कोसळण्याची भिती आहे. त्यामुळे ६६ महामार्गावरील भिती कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com