Nafe Singh Rathee Murder Case: नफे सिंह राठी हत्या प्रकरण; संशयितांचा गोवा हॉटेलमधील CCTV फूटेज समोर

Nafe Singh Rathee Murder Case:चारही आरोपी राठी यांच्या हत्येनंतर गोव्यातील एका हॉटेलमध्ये दाखल झाले होते, त्यानंतरचे CCTV फूटेज समोर आला आहे.
Nafe Singh Rathee Murder Case
Nafe Singh Rathee Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Nafe Singh Rathee Murder Case

इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नफे सिंह राठी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात चारही आरोपी राठी यांच्या हत्येनंतर गोव्यातील एका हॉटेलमध्ये दाखल झाले होते, त्यानंतरचे CCTV फूटेज समोर आला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओत चारही संशयित आरोपी हॉटेलच्या रिसेप्शनवर एकत्र बसल्याचे दिसत आहे. हरियाणा पोलिसांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, संशयितांचा माहिती देणाऱ्यांसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

समोर आलेला व्हिडिओ एक मार्चचा असल्याचे सांगितले जात आहे. राठी यांच्या हत्तेनंतर संशयित आरोपी गोव्यातील एका हॉटेलमध्ये लपून बसले होते.

हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी चार मार्च रोजी छापा टाकून दोन शार्प शूटर्सना अटक केली होती. पण, दोन संशयितांनी पोलिस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी पळ काढला होता. सर्व संशयितांचा कपिल सांगवान उर्फ नंदू गँगशी संबध असल्याचे समोर आले आहे.

Nafe Singh Rathee Murder Case
Yuri Alemao: 'भाजपने 10 वर्षात प्रत्येक संस्था उद्ध्वस्त केली, हुकूमशहांच्या तावडीतून संविधान, लोकशाहीचे रक्षण आवश्यक'

संशयित आरोपी हॉटेलच्या रेसेप्शनमध्ये आरामात बसल्याचे दिसत आहे. पोलिसांनी चौघांच्या नावासह व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, संशयितांच्या नावे बक्षीस जाहीर केले आहे.

संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिस विविध ठिकाणी छापेमारी करत आहे, मात्र अद्याप त्यांच्या हाती काही लागले नाही. गोव्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरु असून, हत्येचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही.

इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नफे सिंह राठी यांची हरियाणातील बहादूरगडमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. माजी आमदार नफे सिंह फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत होते. हल्लेखोरांनी 40-50 राऊंड फायरिंग केल्याचे सांगितले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com