Major Announcement In Goa Budget: गोवा अर्थसंकल्पातील मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा

Major Announcement In Goa Budget: अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २६,८५५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
Major Announcement In Goa Budget 2024-25 | CM Pramod Sawant
Major Announcement In Goa Budget 2024-25 | CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Major Announcement In Goa Budget 2024-25

गोव्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा अर्थसंकल्प गुरुवारी (दि.08) विधानभवनात सादर केला. प्रमोद सावंत यांनी यावेळी अनेक महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या.

अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २६,८५५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यात भांडवली खर्च ६,८५५ कोटी रुपये, महसुली खर्च २० हजार कोटी, महसुली अधिक्य १,७०४ कोटी रुपये आणि राजकोषीय तूट ३,१४९ रुपयांची असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

अर्थसंकल्पातील मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा

मिरामार येथील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीस्थळाच्या नूतणीकरणासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद

कवी मनोहरराय सरदेसाय रवींद्र केळेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची अनुदानित गृह कर्ज योजना यंदा पुन्हा सुरू करणार. योजनेसाठी 15 कोटींची तरतूद.

कदंब बस पूर्णपणे ईलेक्ट्रिक करण्यासाठी 700 कोटींची तरतूद

गोव्यातील प्रत्येक तालुक्यात खेलो गोवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय

हस्तकला कामगारांना 90 टक्के सबसिडी देण्याचा निर्णय

वाळू उत्खन्नासाठी होईल तेवढ्या लवकर प्रयत्न करणार असून, सरकार यासाठी प्रयत्नशील

फार्मागुडी येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र स्थापन करणार

साउंड आणि बीच वेडिंगसाठी सिंगल विंडो परवानगी प्रक्रिया सुरु केली जाणार

जमीन नोंदणीसाठी सांगे तालुक्यात नवीन कार्यालय स्थापन केले जाणार

पोर्तुगिजांनी उद्घवस्त केलेल्या सर्व मंदिरांच्या बदल्यात एक प्रतिकात्मक मंदिर उभारले जाणार, यासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद

Major Announcement In Goa Budget 2024-25 | CM Pramod Sawant
Goa Budget 2024 Top Announcement: कोणत्या खात्याला किती निधी, काय नवीन योजना; जाणून घ्या अर्थसंकल्पातील तरतूद

सेंट फ्रान्सिस झेवियर एक्सपोझिशनसाठी दहा कोटींची तरतूद

स्वंयपूर्ण गोवासाठी सहा कोटींची तरतूद

प्रशासन स्तंभासाठी तीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

वास्को आणि मडगाव बसस्थानकांचा प्रस्ताव

एसटी समाजातील गरीबांना बिरसा मुंडा भूदान योजनेंतर्गत 100 चौ. मीटर जागा दिली जाणार.

महिलांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पातून 30 टक्के खर्च केला जाणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com