Ponda News : मगोबरोबर युती भाजपच्‍या पथ्‍यावर; गोविंद गावडे, ढवळीकरबंधूंची साथ ठरणार निर्णायक

Ponda News : यावेळी भाजपतर्फे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिले आहेत. काँग्रेसतर्फे ॲड. रमाकांत खलप तर ‘आरजी’तर्फे मनोज परब रिंगणात आहेत. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपापला प्रचार सुरू केला आहे.
Ponda
PondaDainik Gomantak

Ponda News :

फोंडा, तालुक्यातील चारपैकी फोंडा, शिरोडा आणि मडकई हे तीन मतदारसंघ दक्षिण गोव्यात तर प्रियोळ मतदारसंघ हा उत्तर गोव्यात येतो.

एरव्‍ही विधानसभा निवडणुकीत प्रियोळ मतदारसंघ हा दक्षिण गोव्यात येतो, असे हे त्रांगडे आहे. सद्यःस्थितीत भाजप आणि मगोची युती असल्याने ती लोकसभा निवडणुकीतील उत्तर गोव्‍याचे भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या पथ्यावर पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी भाजपतर्फे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिले आहेत. काँग्रेसतर्फे ॲड. रमाकांत खलप तर ‘आरजी’तर्फे मनोज परब रिंगणात आहेत. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपापला प्रचार सुरू केला आहे.

Ponda
British Citizen Arrest In Goa: टेरेसवर टोमॅटोसह गांजाची लागवड! गोव्यात ब्रिटीश नागरिकाला अटक

प्रियोळ मतदारसंघात भाजपचा आमदार म्हणून गोविंद गावडे यांना दुसऱ्यांदा निवडून दिल्यानंतर त्यांना कला-संस्कृती खात्याचे मंत्रिपद बहाल केले आहे. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघावर गोविंद गावडे यांचे वर्चस्व आहे.

यापूर्वी प्रियोळ मतदारसंघात मगो पक्षाचे प्राबल्य होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर मगोने जबरदस्त आव्हान उभे केले होते. परंतु अवघ्या मतांनी मगोचे उमेदवार दीपक ढवळीकर यांना हार मानावी लागली होती. तरीसुद्धा मगोने प्रियोळमध्‍ये आपले आव्हान कायम असल्याचे दाखवून दिले होते.

या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार तथा उद्योजक संदीप निगळ्ये यांनीही उमेदवारी दाखल करून बऱ्यापैकी मते मिळवली होती. आता यावेळेला लोकसभा निवडणुकीत मगो आणि भाजप एकसाथ आहेत.

त्यातच संदीप निगळ्ये हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच असल्याने भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांचे पारडे वरचढ वाटत आहे. मगो आणि भाजपची मिळून एकगठ्ठा मते श्रीपाद नाईक यांना मिळतील, अशी शक्‍यता आहे.

माझ्या मते किमान दोन टर्मनंतर उमेदवार बदलला पाहिजे. एका राजकीय पक्षाला संधी दिल्यानंतर दुसरा राजकीय पक्ष काय काम करू शकतो, याचा अंदाज त्यामुळे घेणे सहज शक्य आहे. आता भाजपने दहा वर्षे सरकार चालवले. पण यावेळेला मतदारांनी काँग्रेसला संधी दिली पाहिजे.

- नोनू नाईक, ‘आप’चे ज्येष्ठ कार्यकर्ते

या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या मनात काय आहे हे समजणे कठीण आहे. प्रियोळ मतदारसंघात मगो आणि भाजपची युती असली तरी सर्वसामान्य नागरिकांच्‍या मनात वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर विषयांवरून चीड आहे. त्यामुळे हा राग कसा व्यक्त होतो, ते पहावे लागेल.

- रामनाथ नाईक (माशेल)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com