Madgaon Accident : दोन अपघातांत २ बळी, ७ जखमी; पत्रादेवी चेकनाका आणि बाळ्ळी येथे भीषण अपघात

Madgaon Accident : पत्रादेवी चेकनाक्याजवळ महाराष्ट्रात जाणाऱ्या एका कारने प्रथम एक स्कूटर, नंतर मोटारसायकल व त्यानंतर तपासणीसाठी थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील कांतीलाल विठ्ठल शिंदे (४७, रा. शिंदेवस्ती- पुणे) यांचा मृत्‍यू झाला तर अन्‍य सातजण जखमी झाले आहेत.
Goa Accident Deaths
Goa Accident DeathsDainik Gomantak

Madgaon Accident :

मडगाव पेडणे तालुक्‍यातील पत्रादेवी चेकनाका व दक्षिण गोव्‍यातील बाळ्‍ळी येथे झालेल्‍या दोन वेगवेगळ्‍या अपघातांना २ ठार तर ७ गंभीर झाले. दरम्‍यान, गेल्‍या साडेतीन महिन्‍यांत रस्‍तेअपघातांत १०२ बळी गेले आहेत.

पत्रादेवी चेकनाक्याजवळ महाराष्ट्रात जाणाऱ्या एका कारने प्रथम एक स्कूटर, नंतर मोटारसायकल व त्यानंतर तपासणीसाठी थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील कांतीलाल विठ्ठल शिंदे (४७, रा. शिंदेवस्ती- पुणे) यांचा मृत्‍यू झाला तर अन्‍य सातजण जखमी झाले आहेत.

बाळ्‍ळी येथे झालेल्‍या अपघातात भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्‍याने बसने समोरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्‍वार एकनाथ यशवंत नाईक (६०, रा. बेतूल) यांचा मृत्‍यू झाला. बेतूलचे माजी सरपंच पुरुषोत्तम नाईक यांचे ते भाऊ होत.

Goa Accident Deaths
Goa Today's Top News: राजकारण, गुन्हे, अपघात, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्या

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरु-कर्नाटक येथील खासगी बस बाळ्ळी इस्पितळ परिसरातील महामार्गावर आली असता बसचालक दुर्गाप्पा कारबोंडा (३७, रा. हावेरी-कर्नाटक) याचा बसवरील ताबा सुटला.

बस वेगात असल्याने समोरून जाणाऱ्या दुचाकीला धडक बसली व यात दुचाकीचालक एकनाथ यशवंत नाईक हे गंभीर जखमी झाले. रक्तस्राव होत असल्याने त्‍यांना त्‍वरित बाळ्ळी आरोग्यकेंद्रात नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com