Crime News : रेल्वे स्थानकावर मद्यतस्करी सुरूच; ‘आरपीएफ’कडून हवी सतर्कता

Crime News : इथे खरेदी केलेले मद्य चढ्या भावाने आपल्या राज्यात नेऊन विकतात. ही तस्करी रेल्वे परिसरात थेट रेल्वे ट्रॅक वरून आणि चोर वाटेतून रेल्वेत प्रवेश करून होत आहे.
Crime
Crime Dainik Gomantak

लक्ष्‍मीकांत गावणेकर

Crime News :

फातोर्डा, कोकण रेल्वे स्थानकावर मद्याच्या तस्करीत वाढ झाली असून शेजारील राज्य कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह इतर राज्यातील मद्य तस्कर खास दारू नेण्याच्या उद्देशाने गोव्यात दाखल होत असतात.

इथे खरेदी केलेले मद्य चढ्या भावाने आपल्या राज्यात नेऊन विकतात. ही तस्करी रेल्वे परिसरात थेट रेल्वे ट्रॅक वरून आणि चोर वाटेतून रेल्वेत प्रवेश करून होत आहे.

कोकण रेल्वे स्‍टेशनवर अवैध प्रकरणांना आळा घालण्यासाठी कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे पथक व ‘आरपीएफ’चे पथक अशी दोन पथके स्‍टेशनवर टेहळणी करण्यासाठी कार्यरत असली तरी अनेक मद्य तस्कर या टेहळणी पथकाच्या हातावर तुरी देऊन मध्याच्या बाटल्या बॅगेत टाकून यशस्वीरित्या पलायन करीत आहेत.

रेल्वे स्‍टेशनवर या टेहळणी पथकाकडून मद्य तस्करांवर कारवाई करण्यात येत असली तरी ते प्रमाण अल्प असेच आहे.

Crime
Crime News : आयटी अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाला ३० लाखांना लुबाडले; एका युवतीसह दोघांना अटक

दररोज या दारूच्या बाटल्यांची तस्करी करीत असलेले तस्कर रेल्वे स्टेशनच्या मुख्य दरवाजामधून प्रवेश न करता रेल्वे सुटण्याच्यावेळी दाखल होत असतात आणि रेल्वे ट्रॅकवरून थेट रेल्वे बोगीत प्रवेश करून आपले इप्सित साध्य करून घेत, तसेच त्यांच्याकडून या तस्करीसाठी रेल्वे बोगीत प्रवेश करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात चोर वाटाही तयार केल्या आहेत. आणि याच दिशेने ते रेल्वे बोगीत प्रवेश घेत असतात.

मडगाव रेल्वे स्थानक सभोवतीचा परिसर होलसेल दारूच्या दुकानांनी वेढलेला आहे. घाऊक दारूच्या दुकानांमधून परराज्यातील तस्करांकडून हजारोच्या संख्येने विविध ब्रॅण्डच्या दारूच्या बाटल्यांची खरेदी होत असते. मात्र केवळ मोजकेच तस्कर पोलिसांच्या हाती लागतात.

स्टेशन परिसरात सुमारे १५ घाऊक मद्य दुकाने

स्टेशन पासून अर्ध्या किलोमीटरच्या आत एकंदरीत १२ ते १५ घाऊक दरातील दारूची दुकाने आहेत. यात मडगाव शहरातून ओल्ड रेल्वे स्थानक रस्त्यावरून येताना आठ होलसेल दारू विक्रीची दुकाने आहेत.

यातील सहा दारू विक्रीची दुकाने रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहेत.या दुकानांमधून दारूच्या बाटल्या घेऊन चोरमार्गावाटेने व रेल्वे ट्रॅकवरून लगेच बोगीमध्ये चढता येते. आणि रेल्वेस्थानक जवळ असल्याने दारू तस्कर याच दुकानातून जास्त प्रमाणात दारूच्या बाटल्या खरेदी करीत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com