Loksabha Election 2024 : गोव्‍यात ‘इंडिया’चे सरकार आणू : आमदार वेन्झी व्‍हिएगस

Loksabha Election 2024 : या लोकसभा निवडणुकीत लोकांकडून आम्‍हाला जो पाठिंबा मिळाला आहे ते पाहिल्‍यास हे उद्दिष्‍ट्य गाठणे सहज शक्‍य आहे.
MLA Venzy Viegas
MLA Venzy ViegasDainik Gomantak

Loksabha Election 2024 :

मडगाव, यंदाची लोकसभा निवडणूक ही गोव्‍यासाठी महत्त्वाची असून याच निवडणुकीतून ‘इंडिया’ आघाडीच्‍या नावाखाली गोव्‍यातील लोकांना सक्षम पर्याय देण्‍याचा हा प्रयत्‍न असून २०२७ साली गोव्‍यात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार अस्‍तित्‍वात आणणे हेच आमचे मुख्‍य उद्दिष्‍ट असल्‍याचे मत बाणावलीचे ‘आप’चे आमदार वेन्झी व्‍हिएगस यांनी व्‍यक्‍त केले.

गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना आमदार व्‍हिएगस म्‍हणाले, दिल्‍ली आणि पंजाबात जसे लोककल्‍याणकारी सरकार सत्तेवर आहे. त्‍याच धर्तीवर २०२७ साली गोव्‍यातील सरकार घडविण्‍याचा आमचा इरादा आहे.

या लोकसभा निवडणुकीत लोकांकडून आम्‍हाला जो पाठिंबा मिळाला आहे ते पाहिल्‍यास हे उद्दिष्‍ट्य गाठणे सहज शक्‍य आहे. गोमन्‍तकचे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या यू-ट्यूब, फेसबुक आणि इन्‍स्‍टाग्रामवर उपलब्‍ध आहे.

लाेकांचे कल्‍याण हेच आमचे अंतिम उद्दिष्‍ट आहे. सध्‍याच्‍या सरकारने लाेकांच्‍या खिशावर एवढा भार दिला आहे की तो लोकांना परवडण्‍यासारखा नाही. जर येत्‍या तीन वर्षांत गोव्‍यातील भाजप सरकारने गोव्‍यातील लाेकांच्‍या खिशावरील भार कमी केला तर मला राजकारणातून संन्‍यास घेण्‍यासही आनंद वाटेल. मात्र, असे झाले नाही तर २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीत आम्‍ही लोकांच्‍या रोषाला तोंड फोडू आणि भाजप सरकार हद्दपार करू, असा इशारा व्हिएगस यांनी दिला.

२०२७ साली या आघाडीत ‘आप’ला किती जागा दिल्‍या जातील असे विचारले असता, सध्‍या आम्‍हाला जागांची चिंता नाही. आता आम्‍ही फक्‍त लोकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी वावरणार आहोत. २०१७ साली गोव्‍यात ‘आप’चा एकही आमदार नव्‍हता. २०२२ साली आमचे दोन आमदार निवडून आले. २०२७ साली आम्‍ही सरकारात असणार ही काळ्‍या दगडावरची रेघ आहे. यापूर्वी दिल्‍ली आणि पंजाबमध्‍ये असेच झाले आहे. गोव्‍यातही ‘आप’ त्‍याची पुनरावृत्ती करणार, असे ते म्‍हणाले.

‘भाजप’ने भ्रमात राहू नये!

सध्‍याच्‍या लोकसभा निवडणुकीत झालेल्‍या मतदानावर भाष्‍य करताना व्‍हिएगस म्‍हणाले, आम आदमी पार्टी प्रतिनिधित्‍व करत असलेल्‍या वेळ्‍ळी आणि बाणावली या दोन्‍ही मतदारसंघांत काँग्रेसला विक्रमी मतांची आघाडी मिळणार. सासष्‍टीतील इतर मतदारसंघांतही काँग्रेसला चांगली मते मिळतील.

हिंदूबहुल मतदारसंघांत जी टक्‍केवारी वाढली आहे ती भाजपच्या प्रेमामुळे, या भ्रमात कोणी राहू नये. या भागातील मतदारांची आर्थिक परिस्‍थिती बेताची असून त्‍यातून त्‍यांना वर काढण्‍यासाठी या सरकारने काहीच केले नाही. त्‍यामुळे हा वाढीव मतदारांचा टक्‍का भाजपला धडा शिकविण्‍यासाठी बाहेर आलेला आहे याची जाणीव त्‍यांनी ठेवावी.

MLA Venzy Viegas
Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

हा लोकशाहीचा विजय

आम आदमी पक्षाचे राष्‍ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी स्‍वत: अर्ज न करताही सर्वोच्‍च न्‍यायालयाने त्‍यांचा जामीन मंजूर केला आहे, ही बाब म्‍हणजे लोकशाहीचा विजय आहे. देश हुकूमशाहीच्‍या मार्गावरून परतू लागला आहे याचे हे द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया वेन्झी व्‍हिएगस यांनी शुक्रवारी व्‍यक्‍त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com