Loksabha Election 2024 : दक्षिण दिग्विजयासाठी नरेंद्र मोदी आज गोव्यात; सांकवाळमध्ये भव्य सभा

Loksabha Election 2024 : सायंकाळी ५ वाजता बिट्स पिलानीसमोरील खुल्या जागेत ही सभा होणार असून ५० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे.
PM Modi In Goa
PM Modi In GoaDainik Gomantak

Loksabha Election 2024 :

वास्को, लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण गोव्यातील उमेदवाराला जिंकून आणणे भाजपने अतिशय गांभीर्याने घेतली असून दक्षिण दिग्विजयासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, (ता.२७) गोवा भेटीवर येत असून सांकवाळ-बिर्ला येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

सायंकाळी ५ वाजता बिट्स पिलानीसमोरील खुल्या जागेत ही सभा होणार असून ५० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी या सभेच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली. दक्षिण गोवा गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक (आयपीएस) राहुल गुप्ता यांनी दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, वास्कोचे वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर, यांच्या उपस्थितीत वाहतूक व्यवस्था व इतर महत्त्वाच्या साधनसुविधांचा आढावा घेतला.

बसेस मिळवण्याचे मंत्र्यांपुढे आव्हान

या सभेसाठी मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांतून सुमारे तीस हजारांहून अधिक लोक येणार असल्याने प्रत्येक मतदारसंघांत बसची व्यवस्था करताना भाजप आमदार, मंत्र्यांच्या नाकीनऊ आले आहे. कारण लोक जास्त आणि बसेसची संख्या कमी आहे. कारण चारही मतदारसंघांतून बसेस मागवल्याने कमतरता भासत आहे. काही बसवाल्यांना दोन-दोन ट्रीप मारायला सांगितल्याचे कळते.

महासंचालकांनीही केली पाहणी

शुक्रवारी संध्याकाळी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी सभास्थळी पाहणी केली. शनिवारी सभास्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जसपाल सिंग यांनी यावेळी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बिट्स पिलानी संस्थेच्या सभागृहात बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

वाहतूक मार्गातील बदल असे...

शनिवारी दाबोळी विमानतळ जंक्शन ते बिर्ला क्रॉस जंक्शन आणि बिर्ला टायटन जंक्शन ते दाबोळी विमानतळ जंक्शन हे रस्ते दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद.

मात्र, सभेला जाणाऱ्या लोकांना या मार्गावर प्रवेश दिला जाईल.

PM Modi In Goa
12 th Result Goa : ऊहापोह बारावीच्या कमी निकालाचा; शिक्षक म्‍हणतात, आम्‍हाला दोष देऊ नका

वास्कोकडे जाणारी वाहतूक बिर्ला क्रॉस जंक्शन येथून शरयू टोयोटा हमरस्ता-कुठ्ठाळी जंक्शन-चिखली जंक्शनमार्गे वळविण्यात येईल.

वेर्णा औद्योगिक वसाहत, पणजी, मडगावकडे जाणारी वाहतूक दाबोळी विमानतळ जंक्शन येथून वळवून चिखली जंक्शन- कुठ्ठाळी जंक्शन मार्गे पुढे सोडली जाईल.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६६ वर अवजड वाहनांना बंदी.

वरुणापुरी जंक्शन ते बिर्ला क्रॉस जंक्शन आणि एमईएस जंक्शन ते क्विनी जंक्शन या रस्त्यांवर वाहने पार्क करण्यास बंदी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com