Panaji News : भाजप सरकारला लोक विटले : अमित पाटकर

Panaji News : काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमात पाटकर यांनी उत्तर गोवा उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप व दक्षिण गोवा उमेदवार म्हणून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची नावे जाहीर केली.
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak

Panaji News :

पणजी, देशातील आणि राज्यातील जनता भाजप सरकारला विटलेली आहे. भ्रष्टाचारी जुमला पार्टीविरोधात मतदार मतदानातून राग व्यक्त करतील. प्रचाराला ३० दिवसांचा अवधीही पक्षाला पुरेसा आहे.

एका बाजूला आयात उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला खासदाराविरोधात असलेला असंतोष निश्‍चित मतदानातून दिसून येईल, असा विश्‍वास व्यक्त करीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेसच्या उत्तर व दक्षिण गोवा उमेदवारांची नावे जाहीर केली.

काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमात पाटकर यांनी उत्तर गोवा उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप व दक्षिण गोवा उमेदवार म्हणून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची नावे जाहीर केली. यावेळी त्यांनी व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दोन्ही उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेस कार्यकारिणीचे निमंत्रित तथा माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता, उत्तर गोवा, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आलेमाव म्हणाले, काँग्रेस पक्षाने दोन्ही उमेदवार जाहीर केले, तेव्हा राज्यभरातून आपणास कितीतरी फोन आले.

उमेदवार जाहीर होण्यास थोडा वेळ लागला असेल, परंतु जे उमेदवार काँग्रेसने दिलेले आहेत, त्यात विरियातो हे कॅप्टन राहिलेले आहेत.

कारगिल युद्धात त्यांचा सहभाग राहिला आहे, त्यांनी राज्यातील विविध प्रश्‍नांवर आवाज उठविला आहे. ॲड. खलप हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी केंद्रात कायदा मंत्रिपदही भूषविले होते. इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील.

Amit Patkar
Goa Congress: मोजक्या नेत्‍यांमुळेच काँग्रेसची पीछेहाट, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज; एल्‍वीस गोम्‍स

‘गोव्याचा आवाज लोकसभेत पोचवणार’

पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह तळागाळातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे एकमत आमच्या निवडीवर झालेले दिसून येते, असे सांगत खलप म्हणाले, जनता आम्हाला पूर्वीपासून तुम्ही उमेदवारी घ्या आणि पुढे चला असे म्हणत आली. गोव्याचा आवाज लोकसभेत पोहोचवायचा आहे.

‘ही उमेदवारी समाज कार्यकर्त्यांना’

आपल्याला दिलेली उमेदवारी ही कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना दिली गेली नाही. तर ती विविध प्रश्‍नांवर आवाज उठवणारे, बेरोजगार, वाहतूक विभाग,

मच्छीमार, आपला हक्क मागणारा एसटी समाज, गोवा सांभाळण्याचे काम करणाऱ्या समाज कार्यकर्त्यांना ही उमेदवारी दिली गेली आहे असे नमूद करीत दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो म्हणाले, गोव्यात अनेक प्रश्‍न आहेत, त्याविरोधात लढा दिला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com