Madgao News : मडगावकर मलाच पाठिंबा देतील : पल्लवी धेंपे

Madgao News : माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि त्यांचे बंधू राजेंद्र आजगावकर यांनीही यावेळी प्रचारात भाग घेतला. दामू नाईक व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Pallavi Dhempe
Pallavi DhempeDainik Gomantak

Madgao News :

मडगाव, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान व्हावेत, हेच सर्वांचे एकमेव ध्येय असून त्यासाठी गाठीभेटी सुरू आहेत, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचा आज मडगाव मार्केट परिसर आणि इतर ठिकाणी प्रचार झाला.

मडगाव शहरात त्यांनी काही ठिकाणी कोपरा बैठकाही घेतल्या. दक्षिण गोव्यात भाजपसाठी परिस्थिती खूप चांगली आहे. पल्लवी धेंपे या भरघोस मतांनी विजयी होतील, असेही कामत म्हणाले.

आपण मडगावची कन्या असल्याने मडगाव मार्केट परिसराशी आपला चांगला संबंध आहे. मडगावकर नक्कीच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील, अशी मला खात्री आहे, असे उमेदवार पल्लवी धेंपे यांनी यावेळी सांगितले.

Pallavi Dhempe
South Goa : दुहेरी रेल्वे मार्गाचा विषय काँग्रेसचे दोन्ही खासदार लोकसभेत मांडतील! एलिना साल्ढाणा

माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि त्यांचे बंधू राजेंद्र आजगावकर यांनीही यावेळी प्रचारात भाग घेतला. दामू नाईक व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com