Loksabha Election 2024 : राजकारण्यांच्या उदासीनतेबाबत मांद्रेवासीयांत नाराजी; श्रीपाद भाऊंची प्रचारात गती

Loksabha Election 2024 : ‘मगो’ची भूमिका महत्वाची ; खलपांना मिळणार का साथ?
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रकाश तळवणेकर

Loksabha Election 2024 :

पेडणे, लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून भाजपने श्रीपाद नाईक यांना उमेदवारी जाहीर केली. कॉंग्रेसने बरेच दिवस घेतल्यानंतर ॲड. रमाकांत खलप यांना संधी दिल्यानंतर मांद्रे मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार कोण,ही उत्सुकता होती ती संपली आहे.

असे असले तरी निवडून येण्याअगोदर सगळेच उमेदवार मोठमोठी आश्वासने देतात. नंतर मतदारसंघात फिरकतही नाहीत.आश्वासने पाळत नाहीत, असा मतदारांत एक नाराजीच सूर आहे.

केंद्रीय मंत्री तथा भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी त्यांना सहाव्यांदा भाजपने उमेदवारी दिल्यानंतर लगेच मांद्रेत प्रचार कार्य सुरू केल्याने प्रचारात आघाडी घेतली आहे. तर ॲड. रमाकांत खलप यांनी फेब्रुवारीपासूनच या भागात वैयक्तिकरित्या लोकांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले होते. त्यांचा हा निर्णय त्यांना फायदेशीर ठरला आहे.

Loksabha Election 2024
Goa Congress : काँग्रेसला अंतर्गत बंडाळीचीच भीती ; कार्यकर्ते गोंधळलेले

आरोलकर, सोपटे प्रचारात; पार्सेकर अलिप्त

यापूर्वी पीटर अल्वारीस ,जनार्दन शिंक्रे ,अमृत कासार, संयोगिता राणे सरदेसाई, गोपाळ मयेकर, रमाकांत खलप या उत्तर गोव्यातून निवडून आलेल्या ‘मगो’च्या उमेदवारांना या मतदारसंघाने मोठी आघाडी दिलेली आहे.

मगो पक्ष सध्या मंत्रिमंडळात सहभागी आहे.मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चांगले संबध आहेत. भाजप उमेदवाराच्या विजयासाठीच्या कोपरा बैठकीतून श्रीपाद भाऊंच्या प्रचारात उतरले आहेत. माजी आमदार दयानंद सोपटे हेही भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. या सर्वांचा भाजपला चांगला फायदा होऊ शकतो.भाजपपासून दूर असलेल्या माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

मांद्रे मतदारसंघावर‘मगो’चा वरचष्मा

प्रारंभी मांद्रे हा मतदारसंघ हा ‘मगो’ पक्षाचा बालेकिल्ला. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा हा मतदारसंघ ,तत्कालीन शिक्षण मंत्री ॲंथनी डिसोझा ,ॲड रमाकांत खलप हेही ह्या मतदारसंघातून मगोच्या उमेदवारीवर निवडून आलेले आहेत.

त्यानंतर कॉंग्रेसच्या उमेदवारीवर संगिता परब , दयानंद सोपटे , भाजपच्या उमेदवारीवर लक्ष्मीकांत पार्सेकर, दयानंद सोपटे हे निवडून आले तर २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मगो’ च्या तिकीटावर जीत आरोलकर हे निवडून आलेले आहेत. या मतदारसंघात अजूनही ‘मगो’ चे चांगले अस्तित्व आहे.

यापूर्वीचे मतदान

२००९ ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र देशप्रभु यांना ७४५४ तर श्रीपाद नाईक यांना ८७५९ मते.

२०१४ ः कॉंग्रेसचे उमेदवार रवी नाईक यांना ६४८४ तर श्रीपाद नाईक यांना १६ ३५७ मते.

२०१९ ः कॉंग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना ८३७१ तर श्रीपाद नाईक यांना १७२९६ मते.

आमच्या ‘मगो’ पक्षातर्फे या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.पक्षाचा निर्णय आम्हाला बंधनकारक असून आम्ही मगो पक्ष कार्यकर्ते भाजपच्या विजयासाठी कार्य करणार आहोत. मांद्रे व पेडणेत मगोची चांगली मते आहेत.ती भाजपला मिळवून देण्यासाठी आम्ही सक्रिय आहे.

-राघोबा गावडे , सदस्य,मगो पक्ष कार्यकारिणी समिती

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश सक्षम बनवून देशातच नव्हे तर संपूर्ण जगात भारत देशाला मोठा मानसन्मान मिळवून दिलेला आहे. आज लोकांना आरोग्य, प्रवास, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी व प्रत्येक घटकांसाठी काम केलेले आहे. त्यामुळे मांद्रेतून भाजपला मताधिक्य मिळणार, हे निश्चित.

- मिलिंद तळकर , केरी,भाजप कार्यकर्ते

कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येऊन विश्वासघात करून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांमुळे पक्षाची पुनर्बांधणी करण्यात वेळ गेला.

पण अडीच महिन्यांपासून आम्ही लोक संपर्क सुरू ठेवला होता.भाजपच्या मनमानी राजवटीला आम्ही कंटाळलो आहोत. सध्याचे वातावरण पाहता कॉंग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येणार हे निश्‍चित.

- प्रणव परब, उत्तर गोवा कॉंग्रेस सरचिटणीस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com