Loksabha Election 2024: ''हेवेदावे विसरुन पल्लवी धेंपे यांच्या पाठीशी उभे राहा''; बाबू कवळेकरांचं आवाहन

Chandrakant Kawlekar: केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करून केपे सारख्या भागात विविध प्रकल्प राबवण्यासाठी आम्हाला हक्काचा खासदार आवश्यक आहे.
Chandrakant Kawlekar
Chandrakant KawlekarDainik Gomantak

Loksabha Election 2024: केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करून केपे सारख्या भागात विविध प्रकल्प राबवण्यासाठी आम्हाला हक्काचा खासदार आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक असलेला आणि येथील समस्या त्यांच्यापुढे मांडण्यासाठी सक्षम असा खासदार हवा आहे. यासाठी सर्वांनी हेवेदावे विसरून भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. केपे मतदारसंघातून भाजपला भरघोस मतांची आघाडी मिळवून द्यावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी केले.

भाजपाच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी मंगळवारी केपे मतदारसंघात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सावित्री कवळेकर, नगराध्यक्ष सुचिता शिरवळकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष कुशाली वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, संजना वेळीप, दीपक बोरकर, सरपंच भूपेंद्र गावस देसाई, पंच विन्सेंट डायस, इमॅक्युलेट फर्नांडिस, सिद्धार्थ कालेकर, संतोष प्रभुदेसाई तसेच मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, नगरसेवक प्रसाद फळदेसाई, अमोल काणेकर, माजी सरपंच आलेलुईया आफोंसो, सरिता नाईक, माजी नगराध्यक्ष नाना गावकर, भाजप कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrakant Kawlekar
Loksabha Election 2024: ‘इंडिया’चे मडगावात घोषणाबाजीसह शक्तिप्रदर्शन; काँग्रेसच्या रॅलीदरम्यान कामत यांच्या घरासमोर हुल्लडबाजी

केपे मतदार संघातील प्रचार दौऱ्याची सुरुवात अवडे येथील मिनी मार्केटमधील सभेने करण्यात आली. यानंतर धेंपे यांनी कट्टा आमोणा जंक्शन, श्री पाईक देव सभागृह पाड्डा, शिरवळ या ठिकाणी जनतेला मार्गदर्शन केले. दुपारनंतर नवे खोला, श्री आदिनाथ सभागृह माटवे खोला, श्री विठ्ठल रखुमाई सभागृह साळेरी, श्री महादेव मंदिर बार्से तसेच श्री सप्तकोटेश्वर मंदिर मोरपिर्ला येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. केपे मतदारसंघातील प्रचार दौऱ्यावेळी धेंपे यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पल्लवी धेंपे, दक्षिण गोवा भाजप उमेदवार

पंतप्रधान मोदी यांचे विकसित भारत या स्वप्नपूर्तीठी भाजपाला मतदान करावे. दक्षिण गोव्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे, सच्च्या दिलाने प्रयत्न करेन. जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे केंद्र उपलब्ध व्हावे, या हेतूने निवडून आल्यानंतर दक्षिण गोव्यात स्वतंत्र कार्यालय खुले केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com