Viriato Fernandes Asset: उमेदवारापेक्षा पत्‍नी श्रीमंत; विरियातोंकडे 1.97, पत्‍नीकडे 3.70 कोटींची मालमत्ता

Viriato Fernandes Asset: नौदलाचे निवृत्त अधिकारी असलेले विरियातो यांच्‍यापेक्षा त्‍यांची शिक्षिका म्‍हणून काम करणारी पत्‍नी अनिता यांचीच मालमत्ता अधिक असल्‍याचे आजच्‍या उमेदवारी अर्ज भरताना जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्‍यातून दिसून आले.
Viriato Fernandes Asset:
Viriato Fernandes Asset:Dainik Gomantak

Viriato Fernandes Asset

भाजपच्‍या उमेदवार पल्‍लवी धेंपे यांनी आपली आणि आपले पती उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांची एकूण मालमत्ता १३६१ कोटी रुपये एवढी जाहीर केल्‍यानंतर काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची मालमत्ता किती, याबद्दल सर्वांना उत्‍सुकता लागून राहिली होती.

नौदलाचे निवृत्त अधिकारी असलेले विरियातो यांच्‍यापेक्षा त्‍यांची शिक्षिका म्‍हणून काम करणारी पत्‍नी अनिता यांचीच मालमत्ता अधिक असल्‍याचे आजच्‍या उमेदवारी अर्ज भरताना जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्‍यातून दिसून आले. विरियातो यांची एकूण मालमत्ता १.९७ कोटी तर त्‍यांची पत्‍नी अनिता यांची एकूण मालमत्ता ३.७० कोटी एवढी असून, ती एकूण ५.६७ कोटी इतकी रुपये आहे.

कॅप्‍टन विरियातो यांनी नौदलाच्या आयएनएस शिवाजी, लोणावळा येथून मरिन अभियांत्रिकी केले. त्यानंतर नौदलाच्याच एनआयएटीमधून एअर अभियांत्रिकीमध्ये स्पेशलायझेशन केले. त्यांच्याविरोधात पोलिस स्थानकात एक एफआयआर नोंद आहे. याबाबत मडगाव येथील न्यायालयात खटला सुरू आहे. हा खटला रेल्‍वे दुपदरीकरणाला विरोध करतानाचा आहे.

Viriato Fernandes Asset:
Goa BJP slams K'taka CM: 'स्वत:च्या राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या', गोवा भाजपने सिद्धरामय्यांवर टीका का केली?

मी निवृत्त लष्‍करी अधिकारी आहे. त्‍यामुळे माझ्‍याकडे खूप मोठी संपत्ती नाही. गोव्‍यातील लोक, हीच माझी खरी संपत्ती आहे. दक्षिण गोव्‍यातील शेतकरी, मच्‍छीमार, अन्‍य कष्‍टकरी यांचा प्रतिनिधी म्‍हणून मी या निवडणुकीत उतरलो आहे. त्‍यांना न्‍याय देण्‍यासाठीच ही निवडणूक लढवत आहे.

- कॅ. विरियातो फर्नांडिस,

काँग्रेसचे उमेदवार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com