Loksabha Election 2024 : लोकांची थट्टा करणाऱ्या भाजपला खाली खेचा : कॅप्टन विरियातो फर्नांडिस

Loksabha Election 2024 : यावेळी काँग्रेसचे फोंडा प्रमुख राजेश वेरेकर, गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Captain Viriato Fernandes
Captain Viriato FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

Loksabha Election 2024 :

फोंडा, भाजपच्या सरकारने आतापर्यंत गोमंतकीयांची थट्टा केली असून फसवी आश्‍वासने देऊन सत्ता लाटणाऱ्या भाजपला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हे सरकार खाली खेचा, असे आवाहन काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी फोंड्यातील प्रचारावेळी केले.

यावेळी काँग्रेसचे फोंडा प्रमुख राजेश वेरेकर, गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोंडा तालुक्यात काँग्रेसचा प्रचार सुरू झाला असून यावेळी उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. फोंड्यात झालेल्या या प्रचारादरम्‍यान, बोलताना विरियातो फर्नांडिस म्हणाले की, भाजपाने सत्ता मिळवण्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळ खेळला आहे. राज्यातील खाणी बंद करून आता बारा वर्षे झाली तरी अजून खाणी सुरू होत नाही.

तत्कालीन भाजपाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामुळे खाणी बंद झाल्या. पण त्यानंतर त्या सुविहित आणि लोकांना त्रासदायक होणार नाहीत, अशा रीतीने पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत, महागाई प्रचंड वाढली आहे, रोजगाराचा प्रश्‍न आहे, राज्यात अनेक प्रश्‍न सतावत आहेत.

कोळशाची वाहतूक लोकांना त्रासदायक ठरत आहे. दक्षिण गोव्यात तर समस्यांची जंत्रीच असून कर्नाटकला म्हादई विकणाऱ्या भाजपाला सत्तेवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून आता मतदारांनीच भाजपाला खाली खेचावे असे आवाहन कॅप्टन फर्नांडिस यांनी केले.

फोंड्यातील काँग्रेसचे प्रमुख राजेश वेरेकर म्हणाले की, कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. गोव्यातील विविध समस्यांची जाणीव असलेल्या फर्नांडिस यांनी त्या निराकरण करण्यासाठी विडा उचलला आहे.

Captain Viriato Fernandes
Goa Today's News: RG च्या उमेदवारांचे अर्ज दाखल, राजकारण, गुन्हे विश्वातील गोव्यातील बातम्यांचा आढावा

दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघात काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद हा अतिशय उत्तम असून काँग्रेसने एक चांगले व्यक्तिमत्त्व कॅप्टनच्या रुपाने दक्षिण गोव्याला दिले आहे, त्यामुळे मतदारांनी यावेळेला काँग्रेसलाच प्राधान्य देण्याचे ठरवल्याचे त्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर स्पष्ट होत असल्याचे राजेश वेरेकर म्हणाले.

गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत म्हणाले की, राज्यात अनेक समस्या सतावत असून भाजपाने केवळ गोव्याचा सौदा केला आहे.

अशा स्थितीत आता बदल हा आवश्‍यक असून गोवा फॉरवॉर्डने काँग्रेसला साथ दिली असून दक्षिण गोव्यात भाजपा नव्हे तर काँग्रेसला मतदार निवडतील, आणि एक चांगले सरकार देशाला देईल, असा विश्‍वास दुर्गादास कामत यांनी व्यक्त केला. फोंडा शहर तसेच कुर्टी भागात यावेळी प्रचार करण्यात आला.

आम्हाला फसवी आश्‍वासने नको!

फोंडा तालुक्यात काँग्रेससह त्यांच्या मित्र पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे फोंड्याचे काँग्रेसचे प्रमुख राजेश वेरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आम्ही फसवी नव्हे तर प्रत्यक्षात येणारी आश्‍वासने देतो, असे गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी सांगितले. यावेळेला केंद्रात बदल होणार असून त्यासाठी मतदारर सज्ज असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com