CM Pramod Sawant: ‘लोकोत्सव’ चालतो अंत्योदय, ग्रामोदय तत्त्वावर !

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत: सभापती तवडकरांच्या संकल्पनेला सरकारचा पाठिंबा
 CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

सुभाष महाले

CM Pramod Sawant: आदर्श युवा संघ व बलराम शिक्षण संस्थेचा ‘लोकोत्सव‌’ हा भाजप सरकारच्या अंत्योदय, सर्वोदय व ग्रामोदय या तत्त्वावर चालत आहे त्यामुळे या लोकोत्सवाला सरकारचे सर्व सहकार्य असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकोत्सवाच्या उद्‍घाटन सोहळ्यात सांगितले.

 CM Pramod Sawant
Land Scam In Goa: दुसऱ्याची जमीन परस्पर विकली

आपल्या समाजाबरोबर अन्य समाजांचा पर्यायाने काणकोण तालुक्यातील प्रत्येक घटकाला आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम व समृद्ध करणे हा रमेश तवडकर यांचा ध्यास आहे. त्यांच्या या संकल्पनेला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 CM Pramod Sawant
Sand Extraction: रेती उपसा परवान्यांसाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

यावेळी यूपीचे सभापती सतीश महानप, आमदार डॉ.निकी अंब्री (बिहार), उपसभापती जोसुआ डिसोजा सुवर्णा तेंडूलकर, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, सरपंच सविता तवडकर उपस्थित होते.

सत्कारसोहळा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, महसूल सचिव संदीप जॅकीस, ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर, प्रदीप डा कॉस्ता, ‘गोमन्तक’चे सुशांत कुंकळ्येकर, मेघना शेट, तेजस्वी पै, इशा सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com