Sanguem : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नऊ वर्षाचा कार्यकाल आणि राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या चार वर्षाच्या कार्यकालात झालेला विकास आणि जनतेत भाजप सरकारबद्दल असलेली आस्था पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत सांगे मतदारसंघातून भरघोस प्रतिसाद लाभेल,असा आशावाद सांगे मंडळ भाजप सचिटणीस राजेश गावकर यांनी व्यक्त केला.
ते सांगे मतदारसंघात ‘संपर्क से समर्थन महाअभियान’चा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.या वेळी त्यांच्या सोबत मंडळ अध्यक्ष बायो भंडारी, सुवर्णा जांबवालीकर, सुरज साळगावकर, सांगे भाजपा मंडळ प्रभारी गणपत नाईक उपस्थित होते.
यापुढे राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. 22 जून ला दक्षिण गोव्याची जाहीर सभा रवींद्र भवन कुडचडे येथे आयोजित करण्यात आली आहे. शेवटच्या टप्प्यात मतदान केंद्र बूथवर संपूर्ण मतदारसंघात संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. ता. 28 जून रोजी सांगे मतदारसंघातील सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती राजेश गावकर यांनी दिली. सांगेत समाजकल्याण मंत्री सुभाष फळ देसाई यांनी आतापर्यंत 4.5 कोटींची विकासकामे मंजूर केली आहेत.
पन्नास नागरिकांना भेटणार नेते !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेला विकास पुस्तक रूपाने जनतेच्या हाती देण्यासाठी 30 मेपासून 30 जूनपर्यंत ‘संपर्क से समर्थन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सांगे मतदारसंघातील प्रतिष्ठित अशा पन्नास नागरिकांच्या भेटींच्या उपक्रमात सभापती रमेश तवडकर, दिगंबर कामत, माजी खासदार नरेंद्र सावईकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई सहभाग घेतील, असे राजेश गावकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.