Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

BJP Government: महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात भाजपला सपशेल अपयश आले आहे. गुन्‍हेगारांना हा पक्ष पायघड्या अंथरत आहे.
India Alliance Leaders
India Alliance Leaders Dainik Gomantak

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी आहेत, तर महिलांना सुरक्षा कशी मिळेल? महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात भाजपला सपशेल अपयश आले आहे. गुन्‍हेगारांना हा पक्ष पायघड्या अंथरत आहे. अशा राजकारण्यांकडून जनता सुरक्षा व न्यायाची अपेक्षा कशी काय करू शकणार? असा सवाल ‘इंडिया’ आघाडीच्या महिला नेत्यांनी केला. काँग्रेस भवनात काल सोमवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसच्या प्रवक्त्या मनीषा उसगावकर, गोवा फॉरवर्डच्या ॲड. अश्मा बी आणि आम आदमी पक्षाच्या सिसील रॉड्रिगीस यांची उपस्थिती होती.

सिसील म्हणाल्या की, सुरक्षेच्या बाबतीत भारत १७७ देशांमध्ये १२८ व्या क्रमांकावर आहे. देशाला ‘असुरक्षित राष्ट्र’ म्हणून गणले जात आहे. गोव्यातही महिला सुरक्षित नाही. महिला आणि बालकांना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. तर, अश्मा बी म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांत महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. बलात्काराच्या घडलेल्या घटनांचा आढावा घेत त्यांनी गोवा सुरक्षित ठिकाण आहे का? असा सवाल त्यांनी केली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ‘ ही भाजपची केवळ घोषणाच राहिली आहे. मनीषा उसगावकर म्हणाल्या की, सायबर गुन्हे राेखणे गरजेचे आहे.

India Alliance Leaders
Lok Sabha Election 2024: ''जगात आदर्श ठरलेली भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा डाव''; गोव्यातून अलका लांबा कडाडल्या

सिसील रॉड्रिगीस, ‘आप’च्‍या नेत्‍या

सिद्धी नाईक खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. पर्वरी येथे एका मुलीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेजारच्या राज्यात नेण्यात आला. अलीकडेच पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. तसेच एका ८२ वर्षांच्या महिलेची हत्या झाली. या घटना राज्‍यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे दर्शवितात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com