Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींसाठी मला निवडून द्या! श्रीपाद नाईक

Lok Sabha Election 2024 :खासदार म्‍हणून अनेक कामे लावली मार्गी; शिवोली मतदारसंघात झंझावाती प्रचार दौरा
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Dainik Gomantak

Lok Sabha Election 2024 :

शिवोली, खासदार तसेच केंद्रीय मंत्रिपदाच्या काळात देशाबरोबरच गोव्यातही मी अनेक विकासकामे केली.

तसेच अनेक विकासाभिमुख प्रकल्‍पांचा पाया रोवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कणखर नेतृत्व देशाला लाभले आहे. म्‍हणूनच त्‍यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी उत्तर गोव्यातून मला पुन्हा एकदा भरघोस मतांनी लोकसभेवर पाठवा, असे आवाहन उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

शिवोली मतदारसंघात श्रीपाद नाईक यांनी झंझावाती प्रचार दौरा केला. ओशेल पंचायत क्षेत्रात ग्रामस्थांच्या समस्‍या ऐकून घेतल्यानंतर दांडा-शिवोली येथील श्री जागरेश्वर मंदिराच्या सभागृहात कोपरा बैठकीत मार्गदर्शन करताना त्‍यांनी वरील आवाहन केले.

Lok Sabha Election 2024
Goa Congress : काँग्रेसच्‍या उमेदवाराचा चावडी बाजारात प्रचार

यावेळी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, माजी आमदार दयानंद मांद्रेकर, जिल्हा पंचायत सदस्या सनिशा तोरस्कर, निहारिका मांद्रेकर, विविध पंचायत मंडळे उपस्थित होती. सुरूवातीला नाईक यांनी सडये येथील श्री सातेरी देवीचे दर्शन घेतले. त्‍यानंतर शेळ-सडये येथील श्री आजोबा देवस्थान सभागृहात कोपरा बैठक घेतली.

केंद्रात भाजपचे सरकार असल्यानेच राज्याचा विकास झपाट्याने होत आहे. भविष्यात राज्याचा कायापालट घडवून आणण्यासाठी श्रीपाद नाईक यांना पुन्‍हा दिल्लीत पाठविणे गरजेचे आहे. त्‍यांच्‍याच प्रयत्‍नांमुळे धारगळ येथे आयुष मंत्रालयातर्फे पंचतारांकित सुविधा असलेले आयुर्वेदिक हॉस्पिटल उभे राहिले. समस्‍त गोमंतकीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

- दिलायला लोबो, आमदार (शिवोली)

पर्रीकरांच्‍या स्‍वप्‍नांची पूर्तता करा : मांद्रेकर

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्‍टीमुळे गोवा आज विकासकामांत आघाडीवर आहे. विकासकामांसाठी केंद्रातील पैसा राज्‍याकडे खेचून आणण्याबरोबरच स्वबळावरही राज्याचा विकास करण्याची क्षमता त्यांच्यात होती.

मडकई मतदारसंघातून विधानसभेवर पराभूत झालेले श्रीपाद नाईक यांना केंद्रात पाठवून खासदार ते केंद्रीय मंत्री बनवण्याची किमया पर्रीकर यांनीच साधली. त्यामुळे त्यांच्या स्‍वप्‍नांची पूर्तता करण्यासाठी श्रीपाद यांना सहाव्यांदा लोकसभेवर पाठवा, असे आवाहन दयानंद मांद्रेकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com