Bridge over Chimbel Bay
Bridge over Chimbal BayDainik Gomantak

Chimbel Bridge: ..आता उदघाटन कधी? चिंबल खाडीवरील पूल सुरु होणे गरजेचे

Chimbel : पणजी-फोंडा महामार्गावरील चिंबल येथे असलेले धाकादायक उतरणीवर अपघातांची संख्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चिंबल खाडीवरील पूल अखेर पूर्ण झाला.
Published on

Bridge over Chimbel Bay

तिसवाडी: पणजी-फोंडा महामार्गावरील चिंबल येथे असलेले धाकादायक उतरणीवर अपघातांची संख्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चिंबल खाडीवरील पूल अखेर पूर्ण झाले.

मात्र सदर पूल उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. २१ नोव्हेंबरपासून जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवाचे प्रदर्शन सुरू होणार असल्याने वाहतूक वाढणार, त्यासाठी पुलाचे उद्‍घाटन त्वरित झाले पाहिजे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

सतत अपघात होत असल्याने या पुलाचे बांधकाम दीड ते दोन वर्षात पूर्ण करण्याची मुदत सरकारकडून निश्‍चित करण्यात आली होती. त्यानुसार काम झाले असून काम पूर्ण होऊन पुलाची वजन पेलण्याच्या क्षमतेची चाचणी झाल्याचे समजते. तरी देखील पुलाचे उद्‍घाटन होण्यास आणखी विलंब का होतो, असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. पार्थिव प्रदर्शन, इफ्फी आदी सोहळ्यांशिवाय पर्यटन हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार आहे. या दृष्टीने पुलाचे उद्‍घाटन होणे गरजेचे आहे.

Bridge over Chimbel Bay
Cash For Job: लाखोंच्या देणग्या, महाप्रसाद, दागिने अर्पण; लोकांकडून उकळलेल्या रुपयांतून 'दीपश्री'चे कारनामे

१ किमी. अंतर पार करण्यास एक तास?

चिंबल -रायबंदर नाक्यावर अजूनही वाहतूक कोंडी होत असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. हा एक किलोमीटरचा टप्पा गाठण्यासाठी अर्धा ते एक तास जात असल्याने दोन्ही बाजूने वाहतूक मंद गतीने पुढे जाते. पुलाचे उद्‍घाटन झाल्यास वाहतूक सुरळीत होईल,अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com