Vagator Night Club: संगीताचा ध्वनी कमी करण्यास सांगितल्यामुळे वागातोरमधील क्लबच्या मालकाकडून स्थानिकाला मारहाण

मालकाबद्दल पोलिसात तक्रार दाखल
Vagator Night Club Issue
Vagator Night Club IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Vagator Night Club Issue: वागातोरमधील एका क्लबमध्ये मोठ्या आवाजात संगीत सुरू होते, याबाबत स्थानिकाने आवाज कमी करण्यास सांगितल्याबद्दल त्याला क्लबच्या मालकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत मालकाबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Vagator Night Club Issue
Goa Live Updates 30 December: स्थानिकावर क्लब मालकाने हल्ला केल्याप्रकरणी युरी आलेमाव यांची टीका

संपूर्ण माहिती अशी की, वागातोर मधील रहिवासी ॲश्ले फर्नांडिस हे सकाळी घरी जात असताना त्यांनी लिओनी क्लबमध्ये मोठ्या आवाजात सुरू असलेला संगीत ध्वनी कमी करण्यास मॅनेजरला सांगितले. त्यानंतर ते आपल्या घरी परतले.

आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागात क्लबच्या मालकाने ॲश्ले यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला. या कृतीमुळे त्यांच्या घरचे सदस्यही घाबरून गेले. सदर घटना आज (30 डिसेंबर) सकाळी 5.30च्या सुमारास घडली आहे. त्यानंतर हणजूण पोलीस स्थानकांत ॲश्ले यांनी सदर क्लब मालकाबद्दल तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

डिसेंबर महिन्यात गोव्यातील किनारी विविध संगीत महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवांमध्ये मोठ्या आवाजात सुरू असलेल्या संगीतामुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा पोलीस तक्रार करूनही याबाबत काहीच कारवाई होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com