संगीताप्रमाणे शेतीतही प्रयोग करणारा प्रवीण...

घरासमोर हिरवेगार शेत डोलताना पाहण्याचा आनंद वेगळाच: डॉ.प्रवीण गावकर
Rice Farming
Rice FarmingDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यात संगीतक्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणारे डॉ.प्रवीण गावकर आता कृषी क्षेत्रातही गेल्या वर्षापासून नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. घरासमोर हिरवेगार शेत डोलताना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. वाऱ्यावर डोलणारी शेती डोळ्यांना सुखद अनुभव देते. गेली दोन वर्षे  प्रवीण घरासमोरच असलेल्या आपल्या शेतजमिनीत, सहसा गोव्यात न पिकणाऱ्या ‘इंद्रायणी’ भाताचे वायंगणी पीक घेतो आहे. एरवी हा तांदुळ पुण्याजवळच्या मावळ भागात पिकतो. सुप्रसिद्ध ‘बासुमती’ आणि ‘आंबेमोहोर’ भाताच्या बियांणाचा संकर म्हणजेच इंद्रायणी तांदळाची जात.

Rice Farming
साल नदीतील गाळ काढण्यास पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध

हा भात गोव्यात, काणकोण येथे आपल्या जमिनीत पिकवण्याचा प्रवीणचा निर्णयही योगायोगाचा आणि तितकाच धाडसी असा होता. आपल्या एका संगीत कार्यक्रमासाठी पुण्याजवळच्या एका गावात प्रवीण गेलेला असताना जेवणात त्याने या भाताचा स्वाद चाखला. त्याला तो आवडला. तांदुळ यजमानांच्याच शेतात पिकवला गेला होता.

जेव्हा प्रवीणने हा तांदुळ आपल्या काणकोण येथील शेतात पिकवण्याचे ठरवले तेव्हा तिथल्या लोकांनी त्याला वेड्यात काढले. प्रवीण आपल्या जमिनीची वाट लावतोय असे त्याना वाटले. ‘ज्योती’ आणि तत्सम पारंपरिक तांदळाचे पीक घेणे हीच तिथल्या शेतकऱ्याची वहिवाट ठरून गेली आहे. शेतीखात्याचे अधिकारीही या ‘इंद्रायणी’ तांदळाच्या जातीबद्दल साशंक होते. पण प्रवीणचा स्वभाव एरवीही प्रयोगशील असल्याकारणाने त्याने जोखीम उचलण्याचे ठरवले. अर्थात प्रयोग यशस्वी झाला.

आता या वर्षीही ‘इंद्रायणी’ भाताचीच लागवड प्रवीणने आपल्या शेतात केली आहे. तरव्याच्या लागवडीनंतर शेती आता तरारून आली आहे. हा तांदुळ आकाराने बारीक असून, रंगाने तांबूस असतो व त्याला बासुमतीसारखा मंद सुगंध येतो. त्यामुळे शेतीभोवतालच्या वातावरणातदेखील एक विशेष सुगंध भरून राहिलेला असतो.

तसा हा प्रयोग खर्चिक आहे. पुण्याहून बी मागवलं जातं. कामगार मिळणे हीदेखील एक मोठी डोकेदुखी असते. भात कांडण्यासाठी कारवारजवळ असलेल्या अणशी घाटातील भातगिरणीवर जावं लागतं.

Rice Farming
Goa Carnival Festival: इमेलियानो डायस यांची ‘किंग मोमो’ म्‍हणून निवड झाली

हिरवीगार शेती, थंडगार वातावरण, आणि जवळ जवळ साडे-तीन महिन्यांनंतर मिळणारा सुवासिक तांदुळ यामुळे कष्ट आणि खर्चाचा विसर पडतो. इतर शेतकऱ्यांनीदेखील आपल्या शेतात अशाप्रकारचे नवनवीन प्रयोग करून प्रगतिशील रहावे असे प्रवीणला वाटते. अ‍ॅमेझोनवर ह्या तांदळाची किंमत सद्या 110 रुपये किलो अशी आहे.

- सुभाष महाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com